Post office Yojana new updates 2025: योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते आणि सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणुकीची हमी देखील मिळते, यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना आहे. महिला सन्मान बचत पत्र योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक विशेष बचत योजना आहे. ही योजना भारतात १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना बचतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणली गेली आहे. या योजनेत महिलांना खूप चांगले व्याज मिळते. ही योजना दोन वर्षांसाठी आहे. त्यात किमान एक हजार रुपये जमा करता येतील. तसेच, या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
या योजनेत, दर तीन महिन्यांनी खात्यात व्याज जमा केले जाते. महिला सन्मान बचत पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांना चांगले व्याज मिळते. सध्या या योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर वार्षिक ७.५ टक्के आहे. हे व्याज तिमाही आधारावर जमा केले जाते. महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर १८ वर्षांखालील मुली असतील तर त्यांचे पालक त्यांच्यासाठी खाते उघडू शकतात. याशिवाय, पती आपल्या पत्नीसाठीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
Post office Scheme योजनेवर कर मिळणार आहे का?
महिला सन्मान बचत पत्र योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. या योजनेत महिलांना कर सवलत देखील मिळते. आयकर कायदा ८०-सी अंतर्गत कर लाभ दिला जातो; मात्र योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. याचा अर्थ या योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लाभ उपलब्ध नाही. व्याजावर टीडीएस कापला जातो.
MSSC खात्याचे मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम काय आहेत?
- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्के रक्कम काढण्याची सुविधा मिळते.
- याशिवाय जर कोणत्याही खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत नॉमिनी पैसे क्लेम करून जमा केलेली रक्कम काढू शकतो.
- तसेच खातेदार कोणत्याही मोठ्या आजाराच्या वेळी खात्यातून मुदतपूर्व पैसे काढू शकतो.
- तुम्ही कोणत्याही कारणास्तव मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास तुम्हाला 7.50 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबद्दलच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी
1. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते कोण सुरु करू शकते?
– महिला स्वतःसाठी किंवा त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या वतीने वा योजनेत गुंतवणूक करू शकतात.
2. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र व्याजदर
-महिला सन्मान बचत योजना 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीनुसार 7.5 टक्के वार्षिक व्याज देते.
3. परिपक्वता कालावधी
– महिला सन्मान बचत योजना खाते उघडल्याच्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत परिपक्व होते.
4. खाते कसे उघडायचे?
– केवायसी डॉक्युमेंट्स (आधार आणि पॅन), पे-इन स्लिप आणि पोस्ट ऑफिसमध्ये कॅश किंवा चेकमध्ये गुंतवल्या जाणाऱ्या पैशांसह अर्ज सादर करून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते सुरु करू शकतात.
5. व्याज कसे दिले जाते?
– मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम (मुद्दल तसेच व्याज) ठेवीदाराच्या खात्यात जमा केली जाते.
6. किमान गुंतवणूक
– महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खाते सुरु करण्यासाठी किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
7. कमाल गुंतवणूक
– प्रत्येक ग्राहकाच्या खात्यावर 2 लाखांची कमाल मर्यादा लागू आहे.
हेही वाचा –
• Ladaki Bahin Yojana 3.0 कधी सुरू होणार
• लाडकी बहिण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक कराल
• लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच 10,500 रुपये जमा, सविस्तर माहिती जाणून घ्या
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
1 thought on “बहिणींचं लखपती होण्याचं स्वप्न होणारं पूर्ण; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची योजना | Post office Yojana new updates 2025”