Ladaki Bahin Yojana Letest news: महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहिण’ योजनेचा हप्ता महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत होते, मात्र आता महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
2100 रुपयांच्या बाबीवर काय विचार विनिमय
सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या 2100 रुपये अनुदानावर आता यू-टर्न घेतला आहे. महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
यावरच बोलताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी हे आश्वासन फक्त निवडणूक जाहीरनाम्यातील असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या महिलांना 1500 रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत विरोधकांचा सरकारवर दावा
ladaki bahin yojana today news सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने फसवी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका करत महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत जवळपास 2.5 कोटी महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. यातील 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत, तर 11.8% अविवाहित महिला आहेत. विधवा महिलांचे प्रमाण 4.7% असून, घटस्फोटित, निराधार महिलांचा वाटा 1% पेक्षा कमी आहे.
लाडकी बहीण योजना सन २०२५-२६ साठी ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित असून, महिला बचतगटांच्या सहाय्याने क्रेडिट सोसायट्या सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व वैयक्तिक लाभार्थी योजनांसाठी डीबीटी प्रणाली लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया गतीमान, पारदर्शक आणि प्रभावी होईल.
लाडक्या बहिणीला मिळणार ३,००० रुपये; जाणून घ्या काय आहे कारण
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार?
हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे तर याचे उत्तर देत श्रीमती आदितीताई तटकरे यांनी दिले स्पष्ट उत्तर की या बाबत कुठल्याही प्रकारची चर्चा महायुती सरकारद्वारे करण्यात आलेली नसून, त्याबाबत वेळोवेळी अपडेट्स देत राहू असे त्यांनी सांगितले.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Mala July cha hafta ala nahi
मेरे दो फॉर्म थे सर एक बच्ची का एक पत्नी का
जून के हफ्ते नहीं है नारी शक्ति एप से फॉर्म भरा था
June month che paise alye nhi ajun
Hapta kadhi yenar