लाडक्या बहिणीच्या खात्यात 2,100 रुपये कधी जमा होणार पहा काय आहे अपडेट्स | Today Updates ladaki bahin

By Chaughule Mahesh

Updated on:

Today Updates ladaki bahin: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या सामाजिक दर्जात सुधारणा घडवून आणणे हे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

१५०० की २१००? वाढीव रकमेबाबत मोठा गोंधळ

निवडणूक काळात महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप या रकमेची अंमलबजावणी झालेली नाही.हा मुद्दा विधानसभेत आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले की, राज्य सरकारने अजून अधिकृतपणे २,१०० रुपयांची घोषणा केलेली नाही. या संदर्भात पुढील निर्णय येत्या अर्थसंकल्पात घेतला जाईल. Ladaki Bahin Yojana 2100 rs installment

२१०० रूपयांबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेण्यात येईल

त्यांनी असेही स्पष्ट केले की, राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सरकारचा निवडणूक जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो आणि त्यातील वचने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातात.

रोहित पवार यांनी लाडक्या बहिणींसंदर्भात केलेल्या सवालावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असं म्हटलं आहे.

‘निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देणार असं सरकारने सांगितलं होतं. तर तुम्ही या अधिवेशनात लाडक्या बहिणींसाठी २१०० रूपये करणार आहात का? की नाही?’, असा सवाल रोहित पवार यांनी सभागृहात केला. यावर ‘महायुती सरकारने ही महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. २१०० रूपयांबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल. Today Updates ladaki bahin

Leave a Comment