LIC Vima Sakhi Yojana: केंद्र सरकार आणि एलआयसीने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांना रोजगाराचीही संधी उपलब्ध होते. एलआयसी विमा सखी योजनेत महिला दर महिन्याला ७००० रुपये मिळवू शकतात.
विमा सखी योजनेत जवळपास १ लाख महिलांना जोडण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना वीमा एजंट बनवले जाते. आणि गावात विम्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची संधी दिली जाईल. ही योजना भारतातील तळागाळात पोहचली तर विम्याबाबत जनजागृती होईल.
महिलांना आर्थिक लाभ
डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्त लाभमिळतो.
ग्रामीण भागातील महिलांना वीमा एजंट बनवले जाते. आणि गावात विम्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची संधी दिली जाईल. ही योजना भारतातील तळागाळात पोहचली तर विम्याबाबत जनजागृती होईल.
LIC विमा सखी योजनेत १८ ते ७० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. १०वी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या महिलादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत एका वर्षात १ लाख महिला तर तीन वर्षात २ लाख महिला जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
जर महिलांना विमा पॉलिसी विकली तर त्यांना कमिशन मिळणार आहे. याचसोबत दर महिन्याला ठरावीक रक्कमदेखील दिली जाणार आहे.
हेही वाचा – महिलांना मिळणारं ७,००० रूपये विमा सखी योजनेअंतर्गत
काय आहे विमा सखी योजना
या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात. पहिल्या वर्षी ७००० रुपये देतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दर महिन्याला ६००० रुपये दिले जातील. तिसऱ्या वर्षीत ५००० रुपये दिले जातात. तसेच या योजनेत महिलांना कमिशनदेखील मिळते. या योजनेत महिलांना ट्रेनिंगदेखील दिले जाते. यामुळेच महिलांना दर महिन्याला रोजगार निर्माण होतो. या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. १०वी पास महिलांना या योजनेत काम करण्याची संधी मिळणार आहे. Vima Sakhi yojana letest news