LIC Investment Yojana: नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो LIC investment scheme 2025 एलआयसी कायमच आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट स्कीम घेऊन येत असते कारण वेगवेगळ्या प्रकार मधून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळत असतो. चांगला व्याजदर, सुरक्षितता आणि गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला LIC द्वारे मिळत असतो. आपण आज त्याबद्दल पाहणार आहोत.
तुम्हाला पेन्शन कधी मिळेल?
कोणताही नागरिक या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. स्मार्ट पेन्शन योजनेअंतर्गत पॉलिसीधारक मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत अॅन्युइटीचाही लाभ दिला जातो. पॉलिसीधारकांनंतर नॉमिनीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
एलआयसी कोठून विकत घेऊ शकता?
एलआयसीची स्मार्ट पेन्शन योजना आपण एलआयसीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन (ऑनलाइन खरेदी) किंवा एलआयसी एजंट, पीओएसपी-लाइफ इन्शुरन्स आणि कॉमन पब्लिक सर्व्हिस सेंटरद्वारे ऑफलाइन खरेदी करू शकता.
हेही वाचा – विमा सखी योजना मराठी माहिती
योजनेची खास वैशिष्ट्ये
LIC साठी वयाची पात्रता :
या स्कीममध्ये एन्ट्रीचं किमान वय १८ वर्षे आहे, ज्यामुळे तरुण गुंतवणूकदार लवकर नियोजन करू शकतात. निवडलेल्या अन्युइटी पर्यायानुसार एन्ट्रीचं कमाल वय ६५ ते १०० वर्षे आहे.
LIC फ्लेक्सिबल अॅन्युइटी ऑप्शन
सिंगल लाइफ अॅन्युइटी : ही अॅन्युइटी पेआउट आयुष्यभराची तरतूद करते.जॉईंट लाइन अॅन्युइटीः प्रायमरी अॅन्युइटन्ट आणि सेकंडरी अॅन्युइटटन्ट (जसे की जोडीदार) दोघांसाठी अॅन्युइटी सुरू राहील, याची खात्री केली जाते.
इन्सेन्टिव्हची सुविधा
सध्याच्या एलआयसी पॉलिसीधारकांच्या नॉमिनी आणि लाभार्थीसाठी हायर अॅन्युइटी रेट दिला जातो. ज्यामुळे ही योजना अतिशय लाभदायक बनते. याशिवाय ही पॉलिसी काही अटींसह पार्शिअल अथवा पूर्ण विड्रॉलचा पर्यायही देते, यामुळे पॉलिसीधाकांना गरज भासल्यास फायनान्शिअल फ्लेक्सिबलिटी मिळते.
LIC मध्ये कमीत कमी किती गुंतवणूक करावी?
गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पती-पत्नी संयुक्तपणे खातं उघडून पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी पूर्ण प्रीमियम भरावा लागतो. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. आपल्या गुंतवणुकीच्या आधारेच तुम्हाला पेन्शनचा लाभ दिला जातो.
तुम्हाला किती पेन्शन मिळेल?
जर तुम्हाला दरमहा पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला किमान १००० रुपये पेन्शन मिळू शकते, दर तीन महिन्यांनी पेन्शन हवं असेल तर ३००० रुपये, सहा महिन्यांनी हवी असल्यास ६००० रुपये पेन्शन घ्यायची असेल आणि दरवर्षी पेन्शन घ्यायची असेल तर किमान १२००० रुपये पेन्शन मिळू शकते.