शेतकऱ्यांच्या खात्यात होणार २,१६० कोटी पिक विम्याचे जमा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

By Chaughule Mahesh

Published on:

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) नैसर्गिक आपतीमुळे शेती क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होतात. अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांवर पडणारे विविध प्रकारचे रोग आदींमुळे शेतकऱ्याला हाती आलेले पिक मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून पिकासाठी विमा काढण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पिक विम्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम द्यावी लागत होती. मात्र, आता तर राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या जिल्ह्याना मिळणार पीक विमा

राज्यात यंदा चार जिल्ह्यांमध्ये २५ टक्के अग्रीम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या. त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला. तर तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे. हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली. Fasal Bima scheme

PMFBY Yojana किती मिळणार भरपाई

हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी आणि हिंगोली. या तीन जिल्ह्यांमधील १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ७०५ कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे. तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक २९६ कोटी ८८ लाख रुपयांची अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५४ कोटी ५९ लाख रुपये अग्रीम भरपाई मंजूर करण्यात आली. तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेकऱ्यांना १५४ कोटी ३६ लाख रुपये अग्रीम भरपाई मंजूर करण्यात आली. असे तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ७०५ कोटी ८४ लाख रुपये भरपाई मिळणार आहे. तर १८ लाख ८४ हजार शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे.

तुम्हाला रक्कम कधीपर्यंत मिळणा

शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप ३१ मार्चपूर्वीच करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी (ता.१९) विधीमंडळात दिली आहे.कोकाटे म्हणाले, “३१ मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येईल. राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल. परंतु ३१ मार्चपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप २०२४ चे विमा भरपाई रक्कम जमा करण्यात येईल.” अशी ग्वाही कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली आहे.

पिक विमा मिळण्यास उशीर का झाला

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यापूर्वी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेत अडथळे येत होते. विमा कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होत होता. हक्काची रक्कम मिळवण्यासाठी त्यांना अनेक अडथळ्यांमधून जावे लागत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

त्यामुळे विमा कंपन्या आणि सरकार यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होणार आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार असून नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळू शकेल.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment