Post Bank of India Scheme 2025: मित्रांनो तुम्ही पोस्ट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये या अगोदरही पैसे इन्व्हेस्ट केले असतील, पोस्ट बँक ऑफ इंडिया वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या राबत असते. अशाच प्रकारे आपण आज या तीन योजना बघणार आहोत. की त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे भविष्यासाठी एक भांडवल निर्माण करून देणार आहे.
Table of Contents
🔴 पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post Office Gram Suraksha Yojana)
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही सुरक्षित आहे. या योजनेत तुम्हाला रोज फक्त ५० रुपयांची बचत करायची आहे.या योजनेत तुम्ही ३५ लाख रुपये मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसने ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना सुरु केली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही रिस्क नसते. तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात.
ग्राम सुरक्षा योजनेत तुम्ही ३५ लाखांपर्यंत पैसे मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला वयाच्या ८०व्या वर्षी सर्व रक्कम मिळते. या योजनेत बोनसदेखील मिळतो. या योजनेत जर गुंतवणूकदाराचा ८० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते.
Gram Suraksha Yojana पात्रता
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत १९ ते ५५ वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. यामध्ये तुम्ही १०,००० ते १० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर तुम्ही हे पैसे भरु शकतात.
या योजनेत गुंतवणूकदाराला चार वर्षांनी कर्ज घेण्याचीदेखील सुविधा मिळते. या योजनेत पॉलिसीधारकाला जर पॉलिसी परत करायची असेल तर तीन वर्षांच्या आत परत करु शकतात.
Gram Suraksha Yojana कॅलक्युलेशन
या योजनेत जर तुम्ही दररोज ५० रुपये जमा केले तर महिन्याला १५०० रुपये जमा कराल. दरम्यान, यानंतर तुम्हाला ३५ लाख रुपये मिळू शकतात. तुम्हाला ५५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर ३३,४०,००० रुपये मिळू शकता. तर ६० वर्षानंतर ३४.७० लाख रुपये मिळू शकतात. ८० वय पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम दिली जाते.
हेही वाचा – आयुष्यभर मिळेल पेन्शन; एकदाच गुंतवा LIC मध्ये पैसे | LIC investment scheme 2025
🔴 Post Bank of India FD योजना
पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षे मुदतीसाठी FD योजना उपलब्ध आहेत. पण तुमचा मूळ रक्कम तिप्पट करण्याचा विचार करत असाल, तर 5 वर्षांची FD योजना निवडावी लागेल. सध्या या FD वर वार्षिक 7.5% व्याज दिले जाते. तसेच, ही योजना Income Tax Act च्या 80C कलमाखाली टॅक्स बचतीचंही साधन आहे.
जर तुम्ही या योजनेत ₹5,00,000 गुंतवले, आणि ती FD दर 5 वर्षांनी दोनदा वाढवली, तर पुढील टप्प्यांमध्ये असा परतावा मिळू शकतो:
FD वाढवण्याचे नियम काय आहेत?
- कालावधी – 5 वर्षे असेल तर अंदाजे व्याज (₹) – 2,24,974 आणि एकूण परतावा – 7,24,974 एवढा मिळेल.
- कालावधी – 10 वर्षे असेल तर अंदाजे व्याज (₹) – 5,51,175 आणि एकूण परतावा – 10,51,175 एवढा मिळेल.
- कालावधी – 15 वर्षे असेल तर अंदाजे व्याज (₹) – 10,24,149 आणि एकूण परतावा – 15,24,149 एवढा मिळेल.
या तक्त्यानुसार, मूळ गुंतवणूक असलेली रक्कम 15 वर्षांमध्ये जवळपास 3 पट होते.
FD वाढवण्याचे नियम काय आहेत?
- 1 वर्षाची FD: परिपक्वतेच्या 6 महिन्यांच्या आत वाढवता येते
- 2 वर्षांची FD: परिपक्वतेच्या 12 महिन्यांच्या आत वाढवता येते.
- 3 व 5 वर्षांची FD: परिपक्वतेच्या 18 महिन्यांच्या आत वाढवण्याची सूचना द्यावी लागते.
तुम्ही FD उघडताना देखील परिपक्वतेनंतर वाढवण्याची विनंती करू शकता. परिपक्वतेच्या दिवशी जो व्याजदर लागू असेल, तोच दर पुढील कालावधीसाठी लागू होईल.
शेवटी काय ठरवावं?
जर तुमचा उद्देश दीर्घकालीन बचत असून त्यावर हमखास आणि सुरक्षित परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिस FD हा एक विश्वासार्ह पर्याय ठरतो. तुमचं उद्दिष्ट फक्त बचत नव्हे तर ती रक्कम काही वर्षांत वाढवण्याचं असेल, तर ही योजना नक्कीच उपयुक्त ठरेल.
हेही वाचा 👇👇

🔴 Post Bank of India आवर्ती ठेव योजना
आवर्ती ठेव म्हणजे काय?
ही योजना अशी आहे की तुम्ही दर महिन्याला काही ठराविक रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला १०,००० रुपये जमा केले, तर पाच वर्षांनंतर चांगली रक्कम जमा होते. या योजनेमध्ये सरकारची हमी असते, त्यामुळे पैशांची सुरक्षा खात्रीशीर असते.
योजनेचे फायदे
- नियमित बचत: दर महिन्याला काहीतरी रक्कम जमा केल्याने आपल्याला शिस्तीत बचत करायला शिकायला मिळते.
- चांगले व्याज: सध्या या योजनेवर सुमारे ६.७% व्याज मिळते, जे बँकेतल्या ठेवींपेक्षा जास्त आहे.
- कमी रक्कम पासून सुरूवात: फक्त १०० रुपयेपासून ही योजना सुरू करता येते, त्यामुळे कोणत्याही उत्पन्नाच्या लोकांनाही पैसे गुंतवता येतात.
- सरकारी पाठबळ: ही योजना केंद्र सरकार चालवते, त्यामुळे बाजारातील चढ-उतार याचा या योजनेवर काहीही परिणाम होत नाही.
- कर सवलत: या योजनेत गुंतवणूक केल्यावर आयकरात सूटही मिळते.
चक्रवाढ व्याज म्हणजे काय?
या योजनेत तुम्हाला दरवर्षी व्याजावर देखील व्याज मिळते. म्हणजे फक्त तुमच्या जमा केलेल्या पैशांवरच नाही, तर त्या व्याजावरही तुम्हाला नफा मिळतो. त्यामुळे जास्त काळ गुंतवणूक केली, तितका जास्त फायदा होतो.
कोणासाठी योग्य आहे ही योजना?
ज्यांना नियमित पगार येतो, ते मासिक बचत करु शकतात.मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घर खरेदीसाठी किंवा निवृत्तीनंतर खर्चासाठी पैसे जमवायचे असतील तर ही योजना चांगली आहे.ज्यांना पैसा सुरक्षित हवा आहे आणि धोका घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी ही योजना आदर्श आहे.
खाते कसे उघडावे?
पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन थोडेसे कागदपत्र द्यावे लागतात, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता दाखवण्यासाठी वीज बिल, आणि एक छायाचित्र. नंतर तुम्ही खाते सुरू करू शकता.सामान्यपणे ही योजना ५ वर्षांसाठी सुरू होते. पण तुम्हाला हवे असल्यास हा काळ पुढे वाढवता येतो. दर महिन्याला ठराविक दिवशी पैसे जमा करावे लागतात. हप्ता वेळेत जमा न केल्यास जरा शुल्कही लागू शकते.
हेही वाचा – लहान मोठ्या उद्योगासाठी मिळत आहेत 10 लाख रुपयांचे कर्ज; OBC Loan Yojana In Maharashtra