Bandhkam Kamgar Safety Essential kit Yojana: बांधकाम कामगार योजना त्यामध्ये पुन्हा नव्याने अपडेट आलेले आहे, यामध्ये कामगारांना १३ प्रकारच्या वस्तू मिळणार असून त्याचा जी आर आलेला आहे, चला तर पुढील प्रमाणे GR पाहू.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप याच दृष्टीने शासनाने १८ जून २०२५ रोजी दोन महत्त्वपूर्ण सुधारित (Bandhkam Kamgar Safety Essential kit Yojana news) योजना घोषित केल्या आहेतः
- सुरक्षा संच (Safety Kit) वाटप योजना
- अत्यावश्यक संच (Essential Kit) वाटप योजना.
१) सुरक्षा संच (Safety Kit) वाटप योजनाः
योजनेचा उद्देशः बांधकाम कामगारांना त्यांच्या रोजच्या कामामध्ये लागणाऱ्या सुरक्षिततेच्या साधनांची मोफत पूर्तता करून अपघातांचे प्रमाण कमी करणे.
लाभार्थी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत आणि सक्रिय स्थितीत असलेले कामगार.
सुरक्षा संचामध्ये येणाऱ्या वस्तूः
- 1. सेफ्टी हार्नेस बेल्ट (Safety Harness)
- 2. सेफ्टी शूज
- 3. इअर प्लग.
- 4. मास्क
- 5. रिफ्लेक्टिव्ह जॅकेट
- 6. हेल्मेट.
- 7. सेफ्टी ग्लोव्ह्ज
- 8. सेफ्टी गॉगल्स
- 9. मच्छरदाणी
- 10. पाण्याची बाटली
- 11. स्टील टिफिन डबा
- 12. सौर टॉर्च
- 13. ट्रॅव्हल किट बॅग
हेही वाचा- बांधकाम कामगार योजना आणि त्यांना मिळणारे लाभ | Bandhkam kamgar Yojana 2025
योजनेची अंमलबजावणीः
- पात्र कामगारांनी प्राधिकृत कामगार अधिकारी कार्यालयात अर्ज करावा.
- वस्तूंची निवड ई-निविदा प्रणालीद्वारे नोंदणीकृत कंपन्यांकडून होईल.
- वस्तूंची गुणवत्ता शासनमान्य प्रयोगशाळेतून तपासली जाईल.
- जिल्हा कामगार सुविधा केंद्रामार्फत वितरण व तपासणी केली जाईल.
सुरक्षा संच (Safety kit) पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत शासन निर्णय GR पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
हेही वाचा – बांधकाम कामगारांच्या मुलांना ऍडमिशन साठी मिळणार २० हजार रुपये | Bandhkam Kamgar childrens Scholarship Scheme
२) अत्यावश्यक संच (Essential Kit) वाटप योजना
योजनेचा उद्देशः कामगारांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंची मदत करून त्यांचा राहणीमान सुधारण्याचा हेतू.
लाभार्थीः नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार.
अत्यावश्यक संचामधील वस्तूः
- 1. पत्र्याची पेटी (Galvanized trunk)
- 2. प्लास्टिक चटई
- 3. धान्य साठवण कोठी २५ किलो व २२ किलो.
- 4. बेडशीट, चादर, ब्लॅकेट
- 5. साखर व चहा ठेवण्याचे SS डबे
- 6. १८ लिटर क्षमतेचा वॉटर प्युरिफायर (SS 202, 2 candles)
अंमलबजावणी प्रक्रियाः
- कामगारांनी अर्ज सादर केल्यानंतर पात्रता पडताळणी केली जाईल.
- वस्तूंची खरेदी आणि वितरण निविदा पद्धतीने होईल.
- वितरणाची खातरजमा व तपासणी जिल्हा अधिकारी व मंडळ करत असतील.
अत्यावश्यक संच (Essential kit) पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत शासन निर्णय GR पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा