ladaki bahin yojana June – July Installment date: लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना आनंदाची बातमी, लवकरात लवकर जून आणि जुलै चा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण आर्टिकल आपण yojanasandhi या वेबसाईट वरती बघत आहोत.
ladaki bahin yojana june – July Installment date
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकते. यामागचे कारण असे की महिना संपायला अवघे ६-७ दिवस उरले आहेत अजूनही याबाबत घोषणा केलेली नाही. याआधीही दोन महिन्याचे हप्ते एकाच महिन्याच देण्यात आले आहेत. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळणार या दिवशी | Ladki Bahin Yojana June month Installment
लाडकी बहीण योजना जून जुलै महिन्याचा हप्ता
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) स्वतः घोषणा करुन लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती देतात. त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, जूनच्या १५०० रुपयांबाबत कोणतीही माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही.
मे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर गेला होता. हे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर जून महिन्याचा हप्तादेखील जुलै महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.जर असं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत.
हेही वाचा – लेक लाडकी योजनेचा निधी वितरण सुरू; जिआर आणि अर्ज प्रक्रिया | Lek Ladaki Yojana Updates
योजना संधीचे सदस्य व्हा!
Mazi Ladaki bahin yojana Today news
राज्यातील सर्वात लोकप्रिय असणारी ‘लाडकी बहीण योजना’ असून या योजनेतील पत्र महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. आणि २१०० रुपये कधी मिळणार याची देखील महिलांना आतुरता लागलेली आहे. आणि 2100 कधी मिळणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न देखील महिलांकडून उपस्थित करण्यात येतो आहे. सरकारने विधानसभा निवडणुका अगोदर महिलांना आश्वासन दिलेले होते की, निवडून आल्यानंतर एक २१०० रुपये देऊ परंतु अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रूपये कधी मिळणार?
राज्यातील अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे की, एक 2100 रुपये कधीपासून मिळणार? परंतु एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. की राज्य सरकारला महिलांना 1500 रुपये वितरित करण्यासाठी निधीची खूप मोठ्या प्रमाणात जमाजमाव करावी लागत आहे. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी कोणतेही मंत्री तयार नाहीत.
अजित पवार यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारला असता ते सांगतात की ‘मी 2100 रुपये देण्याचे कधीही आश्वासन दिले नाही’. त्यामुळे २१०० रुपये जर द्यायचे असतील तर त्यासाठी पुढील अर्थसंकल्पामध्ये सरकारला तरतूद करणे आवश्यक आहे. त्यानंतरच निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता वितरित होत असताना महिलांना 1500 रुपये जमा होणार आहेत.