Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana kyc update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला e-KYC करणे बंधनकारक आहे. ही केवायसी आपल्याला दरवर्षी करायची आहे. e-KYC करताना बऱ्याचशा अडचणी येत आहे. ओटीपी चा प्रॉब्लेम येतोय आणि वेबसाईट पण बंद पडते. या गोष्टी आपण सविस्तर बघणार आहोत.
लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी कसे करावे?
- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी मोबाईल किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या ब्राऊजरमध्ये www.ladakibahin.maharashtra.gov.in टाईप करून Enter दाबा.
- यानंतर वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे.
- त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
हेही वाचा – लाडकी बहीण योजना हप्ता आला नाही! फक्त हे काम करा, हफ्ता जमा होईल | Ladaki bahin yojana
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्यात जाता येईल.
यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
- 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- 2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
- शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
KYC करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी
योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – लाडक्या बहिणींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार! खात्यात होणार ३०००₹ जमा | Mazi Ladaki Bahin Yojana
सध्या येत असलेल्या अडचणी आणि महत्त्वाच्या सूचना
mmlby kyc update सध्या ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत आहेत, ज्याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.
- वेबसाइटवरील ताण: राज्यात २ कोटींहून अधिक लाभार्थी एकाच वेळी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत असल्याने वेबसाइटवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे ओटीपी मिळण्यास उशीर होणे किंवा लिंक एक्सपायर होणे यासारख्या समस्या येत आहेत.
- घाई करू नका: प्रशासनाने या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांची मोठी मुदत दिली आहे. त्यामुळे कोणताही लाभार्थी भगिनीने घाबरून जाऊन घाई करू नये. वेबसाइट सुरळीत झाल्यावर तुम्ही ही प्रक्रिया शांतपणे पूर्ण करू शकता. चुकीची माहिती भरल्यास पात्र असूनही अपात्र ठरू शकता.
- एका कुटुंबातील अनेक लाभार्थी: जर एकाच रेशन कार्डवर दोन किंवा अधिक महिला लाभार्थी असतील (उदा. सासू-सून), तर केवळ एकाच महिलेला योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलेची केवायसी प्रक्रिया आधी यशस्वी होईल, तीच पात्र मानली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, पुढील सरकारी निर्देशांची वाट पाहणे योग्य ठरेल.
- विधवा आणि परित्यक्ता महिला: ज्या विधवा महिलांच्या पतीचे निधन झाले आहे किंवा ज्या अविवाहित मुलींच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि त्यांच्या आधारला मोबाईल नंबर जोडलेला नाही, त्यांना ई-केवायसी करताना अडचणी येऊ शकतात. यावर महिला व बालविकास विभाग लवकरच तोडगा काढण्याची शक्यता आहे.
- फसवणुकीपासून सावध रहा: ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी कोणी पैसे मागत असल्यास किंवा चुकीची माहिती देत असल्यास त्यांच्यापासून सावध रहा. ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.
Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana kyc update सर्व लाभार्थी महिलांनी २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. मात्र, सध्या येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस थांबून वेबसाइट सुरळीत झाल्यावरच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा – बांधकाम कामगार योजना नोंदणी, नूतनीकरण मोफत | Bandhkam Kamgar Yojana Free registration in 2025