Bandhkam Kamgar Yojana Free registration in 2025: इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी/ पुन्हा करण्यात येणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे मोफत असणार आहे. याबद्दलची माहिती आणि जीआर आज आपण जाणून घेणार आहोत.
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नुतनीकरण करण्यात येते. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांकरीता २९ विविध कल्याणकरी योजना राबविल्या जातात. सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषय योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारांत वर्गवारी करण्यात आलेली आहे.

सन २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे. उक्त अधिनियमातील तरतूदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रु.२५/-इतके निर्धारित करण्यात आले होते.
तद्नंतर शासनाच्या संदर्भिय क्र.१ येथील पत्रान्वये बांधकाम कामगारांची नोंदणी/नुतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करुन सदर शुल्काची रक्कम रु.१/- करण्यात आली होती. सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण शुल्क माफ करणेबाबत मंडळाच्या दिनांक ०६.०३.२०२५ रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे. त्यास अनुसरुन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण शुल्क माफ करणेबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ मधील कलम १२ (३) व कलम ६२ (२) (g) मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी/नुतनीकरण करण्याकरीता भरावयाची नोंदणी/नुतनीकरण फी (नोंदणी शुल्क) निःशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी GR – इथे क्लिक करा