ABHA हेल्थ कार्डमध्ये ABHA ID नावाचा एक अद्वितीय 14-अंकी ओळख क्रमांक असतो. या डिजिटल हेल्थ कार्डमध्ये महत्वाची आरोग्य माहिती आहे ज्यामुळे उपचार इतिहास आणि वैद्यकीय डेटा त्वरीत आणि सहज प्रवेश करणे शक्य होते. अपवादात्मक रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचारांसह आरोग्य सेवांच्या श्रेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी ABHA हेल्थ आयडी कार्ड वापरून एखाद्याला परवडणारी, उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळू शकते.
आभा हेल्थ कार्ड काय आहे?
आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत? तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.
ABHA हेल्थ कार्डचे हे आहेत फायदे
तुम्ही नवीन डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यास, तुम्हाला वैद्यकीय अहवाल आणि प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवण्याची गरज नाही. तुमचा रक्तगट कोणता आहे, तुम्हाला कोणता आजार झाला आहे, सोबत तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे कधी गेला होता. ही सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल. तुमचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि प्रयोगशाळेतील अहवालांची माहिती आभा कार्डमध्ये राहील. ऑनलाइन उपचार घेणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल, ते आभा कार्ड दाखवून ऑनलाइन डॉक्टरांना सर्व माहिती सहज देऊ शकतात. आभा हेल्थ कार्ड विमा कंपन्यांशी जोडले गेले आहे. ज्याद्वारे तुम्हाला विम्याचा दावा करणे देखील सोपे होईल. तुमच्या मेडिकल स्लिप्स, रिपोर्ट्स इत्यादी गहाळ होण्याची भीती राहणार नाही. तुम्ही सहजपणे तुमचे रेकॉर्ड ऑनलाइन ठेवू शकाल.
सुगम हेल्थकेअर : व्यक्तींना याद्वारे अद्वितीय डिजिटल आरोग्य प्रोफाइल बनवण्याची परवानगी मिळते. हेल्थ आयडी कार्ड याद्वारे आरोग्य सेवा पुरवल्या जातात तसेच या सुविधा पुरवताना रुग्णाचा डेटा सहज उपलब्ध होतो.
व्यक्तिगत आरोग्य रेकॉर्ड लिंक : तुम्ही तुमची सर्व आरोग्य तपासणीची माहिती जसे की रक्त परीक्षण, निदान औषधे आधी सर्व माहिती सहज पद्धतीने यावर सेव्ह करू शकता यानंतर तुम्ही एका क्लिकवर तुमची सर्व रिपोर्ट्सची माहिती तात्काळ पाहू शकता.
डॉक्टर पर्यंत पोहोचणे सोपे: आभा हेल्थ कार्ड ABHA health Card व्यक्तींना मोबाईल ॲपचा वापर करून स्वतःची आरोग्य रेकॉर्ड तपासणीचा इतिहास तत्काळ मिळवण्यास मदत करून देते नवीन डॉक्टराकडे जाणे किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये हे विशेष करून मोठ्या प्रमाणात उपयोगी पडते. यातून रुग्णाला यापूर्वी कुठला आजार होतो, कुठले उपचार सुरू आहेत याची सर्व माहिती आभा कार्ड ABHA Card नंबरवर कोणताही डॉक्टरांना मिळते त्यानुसार डॉक्टरांना तुमच्यावर पुढील उपचार करण्यासाठी ही माहिती उपयोगाची ठरणार आहे
आयुष उपचार : आयुष उपचार संस्थांमध्ये आभा कार्ड स्वीकारले जाणार आहे यामध्ये आयुर्वेद, नैसर्गिक चिकित्सा, योग, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथिक उपचार दिले जातात
आरोग्य विमा लाभ : आपले हेल्थ आयडी कार्ड आरोग्य विमा पॉलिसी जोडून व्यक्ती सहज पद्धतीने आपल्या पॉलिसीची माहितीपर्यंत पोहोचू शकतो यामुळे कॅशलेस रुग्णालयामध्ये भरती होण्यासाठी मोठी मदत होते.
आभा कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
आभा कार्ड link | येथे क्लिक करा |
आयुष्मान कार्ड डाउनलोड लिंक | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
आरोग्य व्यवस्था सक्षम होण्यास कशी मदत?
रुग्णालयातील रुग्ण संख्या व उपचारासाठी लागणारी साधनसामग्रीच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागा, नवीन महाविद्यालये, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी परवानगी देणे असे निर्णय घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर आभा कार्डमध्ये रुग्णांच्या आजाराची नोंद होणार असल्याने ठरावीक कालावधी कोणत्या प्रदेशात, कोणत्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली याची माहिती मिळणे सोपे होणार आहे. तसेच आभा कार्डमुळे रुग्णांच्या आजारासंदर्भातील तपशीलवार माहिती संशोधनासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांना ही माहिती उपयोगी ठरेल. आजघडीला वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या व्यक्तीला स्वत: माहिती गोळा करावी लागतो. यामध्ये त्याचा बराचसा वेळ जातो. मात्र यामुळे ते अधिक सोपे होणार आहे.
आयुष्यमान कार्ड व आभा कार्डमध्ये फरक काय?
आयुष्यमान कार्ड आरोग्य विम्याशी संबंधित कार्ड असून, हे कार्ड फक्त विशिष्ट वर्गांसाठी म्हणजे गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आहे. आयुष्यमान कार्ड हे उपचारादरम्यान आर्थिक मदतीसाठी उपयुक्त आहे. तर आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ अकाऊंट असून, देशातील कोणतीही व्यक्ती हे कार्ड बनवू शकतो. तसेच उपचारादरम्यान वैद्यकीय पूर्वेतिहास समजून घेण्यासाठी या कार्डचा वापर होतो.
घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड | Ayushman Card Download All Information in Marathi (ABY)
आभा कार्ड डाऊनलोड कसं करायचं?
आता हे आभा कार्ड डाऊनलोड करण्यासाठी healthid.abdm.gov.in असं सर्च करायचं आहे. इथं लॉग-इन करायचं आहे.
आभा किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग-इन करू शकता. आभा नंबर, जन्म वर्ष आणि तिथं दिलेलं गणित सोडवून Continue वर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून ही माहिती Validate करायची आहे. कंटिन्यू वर क्लिक. ओटीपी टाकून Continue वर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचं आभा कार्ड दिसेल. इथल्या Download या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
इथं तुम्ही तुमच्या आभा कार्डवरील ईमेल, फोन नंबर आणि इतर माहिती माहिती एडिट करू शकता. तसंच ते delete किवा deactivate करू शकता.