Amrut Typing Yojana Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकार 10वी 12वी शिकलेल्या महिलांसाठी व पुरुषांसाठी कायमच नवनवीन योजना राबवत असतात त्यापैकी ही एक योजना आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.६,५००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.५,३००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत. या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे तसेच अर्ज कसा करायचा अशी सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत.
Table of Contents
अमृत योजनेचा उद्देश
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे.
अमृत योजनेचा लक्षगट
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग /संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्द परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार.
हेही वाचा – महिलांना आनंदाची बातमी पुन्हा एकदा शिलाई मशीन योजना सुरू; लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या
लाभार्थी पात्रता निकष
- अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणेबंधनकारक आहे.
- लाभार्थ्यांचे वय १६ ते ४० वर्ष दरम्यान असावे.
- 3. अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- 4. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे बंधनकारक राहील.
- 5. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी / शुल्काची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती आवश्यक आहे.
- 6. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) व रद्द केलेल्या चेकची प्रत जोडावी.
Amrut Yojana Maharashtra 2025 Typing पात्रता
- अर्जदाराने परीक्षेसाठी इतर कोणत्याही संस्थेकडून अर्थसहाय्य घेतलेले नसावे.
- अर्जदार हा कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा.
- अर्जदार हा डिसेंबर 2024 मध्ये शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स किंवा ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा.
हेही वाचा – या योजनेअंतर्गत महिलांना मिळतात ५ लाख रुपये; तर आजच करा अर्ज
संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजनासाठी कागदपत्रे
- आधार कार्डआधार कार्डला लिंक असलेला मोबाईल
- वय अधिवास प्रमाणपत्र ( Nationality )
- शाळा सोडल्याचा दाखलाउत्पन्न प्रमाणपत्र अथवा EWS
- चालू वर्षाचेबँक पासबुक / Cancel Cheque
- अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र ( स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा )
- संस्थाचालकाचे स्वयंघोषणापत्र ( संस्थाचालकाचे स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा )
- परीक्षा शुल्क पावती
- परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ( माहे डिसेंबर 2024 )
अमृत योजनेच्या महत्त्वाच्या लिंक
अर्ज करण्याची लिंक – येथे क्लिक करा
उमेदवारांचे-स्वयंघोषणापत्र pdf – येथे क्लिक करा
संस्थांचालकांचे-स्वयंघोषणपत्र pdf – येथे क्लिक करा
अमृत योजनेबद्दल लागणारे सर्व डॉक्युमेंट आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळतील.
व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा – येथे क्लिक करा
अमृत योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत
- अमृतच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहीत नमुन्यामध् अमृत संस्थेच्या या www.mahaamrut.org.in संकेतस्थळावरुन अर्ज करावा.
- त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्र / दस्तऐवज अपलोड करावेत.
- 70अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह स्वस्वाक्षरीत (Self-attested) करून विहित मुदतीत अमृतच्या पुणे येथील कार्यालयास पाठविणे आवश्यक राहील.
लाभाचे स्वरूप
- 1. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ३०, ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.६,५००/-(अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
- 2. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिकघुलेखन (मराठी /हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रक्कम रु.५,३००/- (अक्षरी रुपये. पाच हजार तीनशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
- 3. प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थे मार्फत लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल.
- 4. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.
हेही वाचा – महिलांना मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
अमृत योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्धारित केल्यानुसार किमान १० वी उत्तीर्ण राहतील.एकच उमेदवार एकावेळी टंकलेखन व लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यास दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल काय?होय. यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त ०३ (तीन) विषय संगणक टंकलेखनासाठी व ०३ (तीन) विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहतील.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो…
amrut typing yojana maharashtra marathi महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.६,५००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.५,३००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत.
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
एकच उमेदवार एकावेळी टंकलेखन व लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यास दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल काय?
होय. यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त ०३ (तीन) विषय संगणक टंकलेखनासाठी व ०३ (तीन) विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहतील.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यता प्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासनमान्य टंकलेखन संस्थांचे व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये परीक्षा देवून उत्तीर्ण झाल्यास योजनेचा लाभ मिळेल का ?
नाही.
कोणते उमेदवार ह्यासाठी अर्ज करू शकतात ?
डिसेंबर २०२४ मध्ये शासकीय टांकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.