तुम्हाला टायपिंग येतेय का? ६५०० रुपये मिळणार महाराष्ट्र सरकार तर्फे | Amrut Yojna Maharashtra

By Sejal Dhaygude

Updated on:

Amrut Yojana Maharashtra: संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.६,५००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.५,३००/- प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत. या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे तसेच अर्ज कसा करायचा अशी सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उद्देश:

शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि Online लघुलेखन परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत योजनेंतर्गत लक्षित गटातील आर्थिक दुर्बल घटकांमधील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार आणि रोजगारक्षम बनविणे हा आहे. amrut yojna maharashtra

अमृतचा लक्षगट:

खुल्या प्रवर्गामधील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळा द्वारे समकक्ष योजनांचा लाभ होत नाही, अशा खुल्या प्रवर्गामधील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व online लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार.

पात्रता


तिथे पात्रता अशी असणार आहे अमृत संसार यांच्या लाभार्थी होण्यासाठी नियमांची पूर्तता तुम्हाला करणे गरजेचे असणार आहे :

१) जो अर्ज करणारा उमेदवारा असणार आहेत कुठल्याही संस्थेकडून अर्थसहाय्याने घेतलेले नसावे व स्वयंघोषणापत्र व संस्थेचालकाचा स्वयंघोषणा प्रमाणपत्र इथे तुम्हाला सादर करणे कंपल्सरी असणार आहे.
२)उमेदवार टंकलेखन बेसिक कोर्स आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा हे पास झालेल्या पाहिजेल आहे व तिथे तुम्हाला निकालाची प्रत देणे बंधनकारक असणार आहे .

३) टायपिंग परीक्षेसाठी जमा केलेली फी व सेल्फ टेस्टेड सर्व पावती येते गरजेचे असणार आहे.

४)उमेदवारांनी तुमचं स्वतःचं आधार कार्ड जोडलेलं बँक खात्याची गरज असणार आहे त्याची तपासणीवर रद्द केलेले आहे

लाभाचे स्वरूप:

  1. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) जे उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत त्यांना रु.६,५००/- प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मान्य असेल.
  2. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन (मराठी / हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रु.५,३००/- प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मान्य असेल.
  3. अमृत संस्थे मार्फत प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक अकाउंट मध्ये थेट जमा केले जाईल.
  4. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी मान्य राहणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

१) जे अर्जदार असणार आहे त्यांचे आधार कार्ड.
२) पॅन कार्ड.
३)अर्जदाराचा कायमचा पत्त्याचा पुरावा.
४)ई-मेल आयडी.
५)चालू मोबाईल नंबर.
६)नोंदणी अर्ज.
७)अर्जदाराचे पासपोर्ट आकारातील ८)फोटो .
९)बँक पासबुक.
१०)घोषणा प्रमाणपत्र .
११)अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
१२)अर्जदाराचे इनकम सर्टिफिकेट amrut yojana maharashtra typing last date

अमृत Typing Yojana Online अर्ज

अमृत योजना साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने कर्ज करणे बंधनकारक असणार आहे अर्ज करते वेळेस तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण माहिती भरायची आहे व भरल्यानंतर इथे जे आवश्यक कागदपत्रे आहेत जोड्याने सुद्धा बंधनकारक असणार आहेत अर्ज केल्यानंतर त्याची प्रत आवश्यक कागदपत्रासहित स्वस्वाक्षरीत करून जी विहित मुदतीच्या अमृताच्या कार्यालयास सादर करणे इथे गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला इथे लाभ मिळणार आहे.

पात्र उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या वेबसाईटवरून अर्ज करावा.

Leave a Comment