घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड | Ayushman Card Download All Information in Marathi (ABY)

By Chaughule Mahesh

Published on:

Ayushman Card Download All Information in Marathi (ABY)

सरकारकडून मिळतं ‘गोल्डन कार्ड’ कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. ‘आयुष्मान भारत योजना’ ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत सरकार लोकांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – आयुष्मान कार्ड ई-केवायसी

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्रति वर्ष प्रती कुटुंब पाच लाख रुपया पर्यंतचे मोफत उपचार महाराष्ट्र व देशातील इतर राज्यामध्ये योजनेशी संलग्नित सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात केले जातात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

स्वतःचे कार्ड स्वतः बनवा – Ayushman App (App Link)येथे क्लिक करा
आयुष्मान कार्ड GR pdf येथे क्लिक करा
आयुष्मान कार्ड डाउनलोड लिंक येथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता निश्चित कशी होते?

SECC च्या आकडेवारीनुसार आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) लोकांना आरोग्य विमा मिळत आहे. एसईसीसीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील D1, D2, D3, D4, D5 आणि D7 कॅटेगरीतील लोक आयुष्मान भारत योजनेत सामील करण्यात आले आहेत.

शहरी भागात ११ पूर्व निर्धारित पेशा/कामानुसार लोक आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) सामील होऊ शकतात. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत आधीपासूनच समाविष्ट लोक आपोआप आयुष्मान भारत योजनेत सामील झाले आहेत.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता –

आयुष्मान भारत योजना (एबीवाई) मध्ये सामील होण्यासाठी खालील पात्रता निश्चित करण्यात आली आहे –

ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटूंबात वयस्क (१६-५९ वर्ष) नसणे, कुटूंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती/जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति/ वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते.

त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील बेघर व्यक्ति, निराधार, भीक मागणारे, आदिवासी आदि लोक कोणतही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शहरी आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता –

आयुष्मान भारत योजना (एबीवाय) मध्ये सामील होण्यासाठी खास पात्रता खालीलप्रमाणे आहे –

भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे अन्य व्यक्ती.

कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार. सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक आदि आयुष्मान भारत योजनेसाठी (ABY) पात्र ठरवण्यात आले आहेत.

आयुष्मान भारत योजनेत रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया –

आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतरचा खर्चही कव्हर केला जाईल.

योजनेच्या पॅनलमध्ये सामील प्रत्येक रुग्णालयात एक आयुष्मान मित्र असेल. तो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हरसंभव मदत करेल व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरि मदत करेल.

रुग्णालयात एक हेल्प डेस्क सुद्धा असेल जेथे कागदपत्र तपासणी, योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशन यासाठी मदत केली जाईल.

आयुष्मान भारत योजनेत सामील व्यक्ती देशातील कोणत्याही सरकारी व पॅनलमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयात मोफत उपचार प्राप्त करेल.

आयुष्मान भारत योजनेत काय-काय आहे सामील?

आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) जवळपास सर्व आजारांवर उपचार व रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) १३५४ पॅकेज सामील केले आहेत. यामध्ये कोरोनरी बायपास, गुडघे बदलणे व स्टंट लावण्यासारखे उपचारही सामील आहेत.

आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) उपचाराचा खर्च केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेहून (सीजीएचएस) १५-२० टक्के कमी आहे.

एबीवाय (ABY) लाभार्थ्यांची योग्यता काय आहे?

आयुष्मान भारत योजनेचा (एबीवाय) लाभ घेण्यासाठी कोणताही औपचारिक प्रक्रिया नाही. एकदा या योजनेसाठी पात्र ठरवले गेल्यास तुम्ही थेट कोणत्याही आजारावर उपचार करू शकता. सरकारद्वारे निश्चित केलेल्या कुटूंबातील सदस्य आयुष्मान भारत योजनेत सामील होई शकतात.

केंद्र सरकार सर्व राज्य सरकारे व विभागातील अन्य संबंधित एजन्सीसोबत एबीवायच्या दृष्टीने योग्य कुटूंबाची माहिती शेअर करेल. त्यानंतर संबंधित कुटूंबाला एक फॅमिली आयडेंटिफिकेशन नंबर मिळेल. या यादीत समाविष्ट लोकच आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.

ज्या लोकांकडे २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे कार्ड असेल ते सुद्धा आयुष्मान भारत योजना (एबीवाय ) चा लाभ घेऊ शकता.

आयुष्मान भारत योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

  • सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
  • तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा.
  • मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक (Mobile Number), नाव, रेशन कार्ड नंबर (Ration Card Number) किंवा RSBY URN नंबर टाका.
  • जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
  • तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.
  • याशिवाय, तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.

ऑनलाइन आयुष्मान कार्ड काढण्यासाठी काय करावे?

  • ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करा.
  • तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करू शकता किंवा सरकारी वेबसाइटला भेट देऊन कार्डसाठी अर्ज करू शकता.
  • ॲप डाउनलोड केल्यावर मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा.
  • पात्रता तपासा.
  • पात्र असाल तर आधार ई-केवायसी करा.
  • फोटो अपलोड करा आणि कार्ड डाउनलोड करा

असे करा आयुष्मान कार्ड डाउनलोड करा

जर तुमचे आयुष्मान कार्ड मंजूर झाले असेल तर तुम्ही आयुष्मान भारत हेल्थ कार्ड सहज डाउनलोड करू शकता. आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सर्व माहिती खाली दिली आहे:-

  • आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रथम https://beneficiary.nha.gov.in/ साइटवर जावे लागेल.
  • आयुष्मान कार्डसाठी मोबाइल नंबरद्वारे पीडीएफ डाउनलोड करा, खालील चरणांचे अनुसरण करा.
  • आता तुमचा लाभार्थी पर्याय निवडल्यानंतर, मोबाइल नंबरचा पर्याय दिसेल. तुम्हाला आयुष्मान भारत खात्याशी लिंक केलेला फोन नंबर टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्या फोनवर OTP येईल. तुम्हाला ओटीपी टाकून पडताळणी करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फॅमिली आयडी आणि आधार क्रमांक भरावा लागेल जेणेकरून तुम्ही तुमची ओळख पडताळू शकता.
  • संपूर्ण माहिती भरून तुम्हाला स्वतःची पडताळणी करावी लागेल. आता जर तुमचे आयुष्मान कार्ड मंजूर झाले असेल तर तुम्हाला कार्डच्या स्टेटसमध्ये ‘Approved’ लिहिलेले दिसेल.
  • आता आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड कार्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यानंतर, तुम्हाला OTP कोडसह स्वतःची पुन्हा पडताळणी करावी लागेल.
  • तुम्ही स्वतःची पडताळणी करताच, तुम्ही तुमचे आयुष्मान भारत हेल्थ कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता. तुम्ही आयुष्मान कार्ड pdf मध्ये देखील डाउनलोड करू शकता (आयुष्मान कार्ड डाउनलोड PDF).

Leave a Comment