Bandhkam Kamgar All Schemes in 2025: इमारतीच्या सुरुवात खुदाई काम करण्यापासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात त्यांना नोंदणी करता येते व योजणांचा लाभ घेता येतो. या सर्व योजनांचा लाभ तुम्हीही घेऊ शकता. त्यासाठी आहे आजचे आर्टिकल.
उदा.
- १) खुदाई कामगार.
- २) सेंट्रींग कामगार.
- ३) गवंडी कामगार.
- ४) फर्फीटींग (फरशी, इलेक्ट्रीकल).
- ५) पेंटींग कामगार.
- ६) फर्निचर, सुतार कामगार
- ७) फॅब्रीकेटर्स,
- ८) वेल्डिंग
- ९) सर्व असंघटीत कामगारांसाठी
हेही वाचा – बांधकाम कामगारांच्या मुलांना ऍडमिशन साठी मिळणार २० हजार रुपये | Bandhkam Kamgar childrens Scholarship Scheme
नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक
- १) पासपोर्ट आकारातील ४ फोटो
- २) नियोक्त्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांचे ९० दिवसाचे प्रमाणपत्र
- ३) आधार किंवा मतदान कार्ड
- ४) रेशन कार्ड झेरॉक्स
- ५) बँक पासबुक झेरॉक्स
बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात
१. बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहीत्य खरेदीसाठी – ५,०००/- तीन वर्षातून एकदा.
२. बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास ३०,०००/-बांधकाम कामगाराच्या पत्नीस २ आपत्या पर्यंत –
- नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/-
- शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/-
३. बांधकाम कामगारच्या मुलीच्या विवाहासाठी ५१,०००/
हेही वाचा – आता बांधकाम कामगार योजनेतून कामगारांना 1 लाख रुपयांपर्यंत मदत; Bandhkam Kamgar Yojna 2025
बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी
- १) १ ली ते ७ वी २,५००/- प्रतीवर्षी
- २) ८ वी ते १० वी ५,०००/- प्रतीवर्षी
- ३) ११ वीं १२ वी १०,०००/- प्रतीवर्षी
- ४) पदविका अभ्यासक्रमासाठी २०,०००/-
- ५) पदवी साठी २०,०००/-६) अभियांत्रिकी पदवीसाठी ६०,०००/-
- ७) वैद्यकीय पदवीसाठी १,००,०००८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी शुल्काची परीपूर्ती व इतर…
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १,००,०००/- मुदत बंद ठेव
- बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी १,००,०००/- अर्थसाहाय्य
- बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्रा अंतर्गत उपचारासाठी ६,०००/- अर्थसाहाय्य
- बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास २,००,०००/- अर्थसाहाय्य
- बांधकाम कामगार मृत्यु झाल्यास अंतविधीसाठी १०,०००/- अर्थसाहाय्य
- बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग ५ वर्षे २४,०००/- अर्थसाहाय्य
- बांधकाम कामगाराचा कामावर मूत्यु झाल्यास ५,००,०००/- अर्थसाहाय्य
- घर बांधणी साठी-४,५००००/- (केंद्र शासन-२,०००००/- कल्याणकारी मंडळ २,५००००/-) अर्थसाहाय्य
- नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू करणे.
- बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता.
हेही वाचा- बांधकाम कामगारांना वस्तू संच मिळण्यास सुरुवात; कधी मिळणार जाणून घ्या | Bandhkam Kamgar Yojana 2025
कामगारांनी नोंदणी कशी करावी?
बांधकाम कामगारांना या योजना मिळवण्यासाठी आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:
- वय १८ ते ६० वर्षे असावे.
- बांधकामाशी संबंधित कोणतेही काम करत असणे (जसे मजुरी, सुतारकाम, लोहारकाम, प्लंबर वगैरे).
- आधार कार्ड,बँक खाते,रेशन कार्ड,राहणीचा पुरावा आणि ९० दिवसांचे कामाचे कागदपत्र असावे.
- नोंदणी ऑनलाइन (https://mahabocw.in/) किंवा जवळच्या कामगार कार्यालयात करता येते.
- नोंदणी झाल्यानंतर कामगारांना ओळखपत्र दिले जाते.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
बांधकाम कामगारांना या सर्व प्रकारच्या योजनांच्या लाभ घेता येतो. या पुढेही या सर्व योजनांची माहिती आपल्या वेबसाईट वरती येत राहतील….
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा