बांधकाम कामगारांच्या मुलांना ऍडमिशन साठी मिळणार २० हजार रुपये | Bandhkam Kamgar childrens Scholarship Scheme

By Chaughule Mahesh

Published on:

Bandhkam Kamgar childrens Scholarship Scheme: महाराष्ट्र राज्यातील इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांच्या मुलांना मिळणार पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. जून २०२५ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिष्यवृत्तीचे प्रकार आणि रक्कम

पदवी अभ्यासक्रमांसाठी (BA, BCom, BSc, BCA, BEd इ.)

या योजनेअंतर्गत तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी २०,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तीन वर्षांच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी एकूण ६०,००० रुपये मिळतात. या अभ्यासक्रमांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक अनुप्रयोग, शिक्षणशास्त्र इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.

पदव्युत्तर पदवी आणि डिप्लोमासाठी

पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी २५,००० रुपये शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम सामान्यत: दोन वर्षांचा असल्याने एकूण ५०,००० रुपये मिळतात. यामध्ये पदव्युत्तर पदवी, BEd, MEd आणि इतर व्यावसायिक डिप्लोमा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्यात येणार आहे; महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mahajyoti Free Tablets Yojana

पात्रतेचे निकष

  • मूलभूत पात्रताकामगाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेली असावी
  • कामगाराचे लेबर कार्ड वैध असावे
  • विद्यार्थ्याने १२वी उत्तीर्ण केली असावीजून २०२५ मध्ये नवीन प्रवेश घेतला असावा.

कुटुंबातील मर्यादा

एका लेबर कार्डावरून दोन मुलांना शिष्यवृत्ती मिळू शकते. जर कामगार पुरुष असेल तर त्याच्या पत्नीलाही शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळू शकते. एकाच कुटुंबातील आई आणि वडील दोघेही कामगार असल्यास त्यांच्या स्वतंत्र लेबर कार्डावरून वेगवेगळे अर्ज करता येतात.

हेही वाचा – रेशन धारकांना खुशखबर ! पुढील ३ महिन्यांचे राशन मिळणार एकदाचं, काय आहे शासनाच्या निर्णय | Rashan Card new Updates

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थ्याची कागदपत्रे

  • १२वीचा गुणपत्रक – मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या १२वी परीक्षेचा गुणपत्रक
  • प्रवेश पावती – सध्याच्या अभ्यासक्रमातील प्रवेशाची पावती किंवा फीस भरल्याची पावती
  • चालू शैक्षणिक वर्षाचा बोनाफाईड – महाविद्यालयाकडून मिळणारा बोनाफाईड प्रमाणपत्र (विद्यार्थ्याचा फोटो आणि महाविद्यालयाचा शिक्का असलेला)
  • आधार कार्ड – विद्यार्थ्याचे आधार कार्ड

कामगाराची कागदपत्रे

  • स्मार्ट कार्ड – बांधकाम कामगाराचे वैध स्मार्ट कार्ड
  • एक रुपयाची पावती – लेबर कार्ड नूतनीकरणाची पावती
  • राशन कार्ड – कामगाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असलेले राशन कार्ड.

हेही वाचा – शेतकरी मित्रांना मिळणार 5 लाख रुपये | Vihir Anudan Yojana 2025 in Marathi

योजनेची अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज-

अर्ज करण्यासाठी mahaboc.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते. येथे कल्याणकारी योजना विभागात जाऊन शैक्षणिक योजनेचा पर्याय निवडावा लागतो. E04 योजना ही पदवी अभ्यासक्रमासाठी आहे, तर उच्च शिक्षणासाठी वेगळी योजना आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment