कामगारांना सुरू होणार १२००० रुपयांची पेन्शन योजना; अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती | Bandhakam Kamgar Pension Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Bandhakam Kamgar Pension Yojana 2025: बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या योजना बरोबरच त्यांना पेन्शनही देणे गरजेचे आहे. त्यासाठी ही bandhkam kamgar Pension Yojana all information in Marathi ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (२२) (ब) मध्ये वयाची ६० वर्षे पुर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे. याबाबत केंद्र शासनाने विषद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक २८.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे शासनाचा निर्णय

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यास अनुसरुन मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती (SOP) पुढीलप्रमाणे विहित करणेत येत आहे.

हेही वाचा- बांधकाम कामगारांना मिळणारं या १३ वस्तू मोफत | Bandhkam Kamgar Safety Mofat Essential kit Yojana

योजना कोणासाठी आहे.

ही योजना विशेषतः महाराष्ट्र भवन व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगारांसाठी आहे. सध्या राज्यात सुमारे 37 लाख नोंदणीकृत कामगार आहेत, आणि अजून 16 लाख जणांचे नूतनीकरण बाकी आहे.

निवृत्तीवेतन योजनेचे पात्रता निकष :-

  1. वयाची ६० वर्षे पुर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान १० वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील.
  2. तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील.
  3. पती/पत्नी च्या मृत्यूनंतर संबधित बांधकाम कामगाराचे पती/पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील. तथापि, पती/पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनमिळत असेल तर संबधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही.
  4. जर पात्र लाभार्थी नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदारास पेन्शन देण्यात येणार आहे.

हेही वाचा – बांधकाम कामगारांना मिळतात या ५ योजना; तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता | Bandhkam Kamgar All Schemes in 2025

निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाण/दर :-

  1. मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल.
  2. मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण/दर खालीलप्रमाणे राहील :-
निवृत्तीवेतन दर
निवृत्तीवेतन माहिती
अ.क्र. मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्षे दरवर्षी मिळणारे निवृत्तीवेतन (रू.)
१० वर्ष ५०% (रु.६,०००/-)
१५ वर्ष ७५% (रु.९,०००/-)
२० वर्ष १००% (रु.१२,०००/-)
  • 3. मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराचा वेळोवेळी आढावा घेवून, सदर योजनेअंतर्गत देय निवृत्तीवेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेअंती शासन स्तरावर घेतला जाईल.

हेही वाचा- बांधकाम कामगार योजना आणि त्यांना मिळणारे लाभ | Bandhkam kamgar Yojana 2025

Bandhkam kamgar Pension Yojana कागदपत्रे

१) अर्ज प्रक्रिया कशीः उपलब्ध करून देण्यात आलेल्या विहित नमुन्यांमध्ये अर्ज विना शुल्क उपलब्ध आहेत.

२) अर्ज जमा करण्याचे ठिकाणः अर्ज मध्ये सर्व वैयक्तिक माहिती भरून आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह जिल्ह्याच्या कामगार सुविधा केंद्र मध्ये जमा करणे. आवश्यक जिथे कामगारांचे आधार कार्ड नोंदणीकृत करण्यात आलेले आहे.

  • १. पत्त्याचा पुरावा-आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत
  • २. जन्मतारखेचा पुरावा-जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित छायाप्रत
  • ३. बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत

बांधकाम कामगार पेन्शन योजना GR आणि फॉर्म डाउनलोड

GR (शासन निर्णय ) Download – इथे क्लिक करा

अर्ज Download – इथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रूप – जॉईन करा

telegram ग्रूप – जॉईन करा

हेही वाचा – बांधकाम कामगारांच्या मुलांना ऍडमिशन साठी मिळणार २० हजार रुपये | Bandhkam Kamgar childrens Scholarship Scheme

बांधकाम कामगार पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

  • सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगाराने https://mahabocw.in/ या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त (Download) करून घ्यावा. (अर्जाचा नमूना “प्रपत्र-अ प्रमाणे)
  • सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे (WFC) प्रभारी (कामगार उपायुक्त/सहायक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांच्याकडे जमा करावा.
  • सर्व कागदपत्रे जोडावी
  • संबधित प्रभारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छानणी करून “निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र” (प्रपत्र-ब) सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा. एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी/नुतनीकरणाचा कालावधी असल्यास संबधित जिह्यामधून “वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र” (प्रपत्र-क) संबधित प्रभारी, जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे.
  • मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबधित बांधकाम कामगारास “निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र” देण्यात येईल. (प्रपत्र-ड)
  • निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबधित बांधकाम कामगाराचा निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल.
  • दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा दाखला (प्रपत्र-इ) पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल त्यासाठी त्याने आधारकार्ड/मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रभारी अधिका-यांकडून हयातीचा दाखला प्राप्त करून द्यावा. जेणेकरून, त्या वर्षीचे निवृत्तीवेतन त्याच्या खात्यात जमा करता येईल.
  • मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारास त्याचे बँक खाते बदलावयाचे असल्यास तसा अर्ज त्यास प्रभारी, जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल.
  • मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास, त्याचा/तीचा वारसदार पती/पत्नीने वारस नोंदीचा अर्ज प्रभारी, जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल.
  • सदर निवृत्तीवेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) या प्रणालीवर घेण्यात येईल व दरमहा संबधित निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगाराच्या खात्यावर निवृत्तीवेतन जमा करण्यात येईल.

पेन्शन वितरण प्रक्रियाः

  • प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संबंधित DBT प्रणालीद्वारे निवृत्तीवेतन कामगारांच्या खात्यात जमा केले जाते.
  • वितरणात अडचण आल्यास स्वतंत्र फाईल तयार करून पुन्हा वितरण केला जातो.

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….

अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment