Bandhkam kamgar Yojana 2025: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा लाभ हा ममिळत असतो, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या दैनदिन गरजा भागवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना कार्यरत आणली आहे.
कामगारांनी नोंदणी कशी करावी?
बांधकाम कामगारांना या योजना मिळवण्यासाठी आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:
- वय १८ ते ६० वर्षे असावे.
- बांधकामाशी संबंधित कोणतेही काम करत असणे (जसे मजुरी, सुतारकाम, लोहारकाम, प्लंबर वगैरे).
- आधार कार्ड,
- बँक खाते,
- रेशन कार्ड,
- राहणीचा पुरावा आणि ९० दिवसांचे कामाचे कागदपत्र असावे.
- नोंदणी ऑनलाइन (https://mahabocw.in/) किंवा जवळच्या कामगार कार्यालयात करता येते.
नोंदणी झाल्यानंतर कामगारांना ओळखपत्र दिले जाते.
हेही वाचा- घरगुती सोलर पॅनल बसवण्यासाठी मिळणार तब्बल ७८,००० रुपये | PM Surya Ghar Yojana 2025
कामगारांना मिळणारे मुख्य फायदे:
१. पैसे मिळणे:
- ६० वर्षांनंतर मासिक निवृत्ती वेतन मिळते, जे त्यांचे आर्थिक आधार बनते.
- अचानक गरज पडल्यास २,००० ते ५,००० रुपये एकदा दिले जातात.
- दिवाळीला बोनस म्हणून काही पैसे मिळू शकतात.
- शिक्षणासाठी मदत:कामगारांच्या मुलांना शाळेतील शिक्षणासाठी दरवर्षी पैसे मिळतात.
- कॉलेज किंवा व्यावसायिक अभ्यासासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
- काही वेळा शैक्षणिक साहित्य आणि गणवेशासाठी मदत केली जाते.
२. लग्न आणि कुटुंबासाठी मदत:
- लग्नासाठी पैसे दिले जातात, जे कामगारांच्या कुटुंबाला मदत करतात.
- घरकामासाठी आवश्यक वस्तू (ताट, वाटी, भांडी वगैरे) मोफत मिळतात.
- घरासाठी मदत:घर बनवण्यासाठी ५ ते ६ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
- काही वेळा तात्पुरता घरासाठी भत्ता देखील दिला जातो.
- आरोग्य आणि सुरक्षा:अपघात झाला तर मोठ्या रकमेचा विमा मिळतो.
- गंभीर आजारांसाठी उपचार खर्च मदतीला मिळतो.
- कामाच्या ठिकाणी हेल्मेट, ग्लोव्हजसारखी सुरक्षा साधने दिली जातात.
३. इतर मदती:
- नवीन काम शिकण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
- महिला कामगारांना प्रसूतीसाठी पैसे मिळतात.
- कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी पैसे दिले जातात.
हेही वाचा- बांधकाम कामगारांना वस्तू संच मिळण्यास सुरुवात; कधी मिळणार जाणून घ्या | Bandhkam Kamgar Yojana 2025
Bandhkam Kamgar Yojana पात्रता
- १)अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
- २)कामगार अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
- ३)कामगाराने किमान ९० दिवस काम केले असावे.
- ४)कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांची नोंदणी करावी.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेः
- 1)आधार कार्ड
- 2)रहिवासी पुरावा (राशन कार्ड, सुतदार ओळखपत्र, वीज बिल इ.)
- 3)पॅन कार्ड
- 4)बँक खात्याचे तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला चेक)
- 5)पासपोर्ट आकाराचा फोटो
- 6)बांधकाम क्षेत्रात काम केल्याचा पुरावा (कामगार ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र, नियोक्त्याचे प्रमाणपत्र)
- 7)उत्पन्नाचा दाखला
- 8)स्वयं-घोषणापत्र
हेही वाचा- हालहान मोठ्या उद्योगासाठी मिळत आहेत 10 लाख रुपयांचे कर्ज; OBC Loan Yojana In Maharashtra
लाभ घेण्याची पद्धत:
- नोंदणीकृत कामगारांनी ऑनलाइन किंवा कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्याचा तपास होऊन नंतर पैसे थेट बँकेत जमा केले जातात. अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहता येते.
- योजनेचा फायदा काय? या योजनेमुळे कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळते, त्यांचे मुलं शिकू शकतात, कुटुंबाला आधार मिळतो आणि त्यांचे आरोग्यही सुधारते.
- थोडी आव्हाने: काही कामगारांना योजनेबद्दल माहिती नाही. काही वेळा नोंदणी करायला अडचणी येतात. काही योजना थोड्या काळासाठी थांबवल्या गेल्या आहेत.
- बांधकाम कामगारांच्या आयुष्याला सुधारण्यासाठी या योजना खूप महत्त्वाच्या आहेत. कामगारांनी नोंदणी करून या योजनांचा फायदा घ्यावा. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन चांगले होईल आणि समाजही पुढे जाईल.
हेही वाचा 👇👇👇

अर्ज करण्याची प्रक्रियाः
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- 1)अधिकृत वेबसाइटला भेटा www.mahabocw.in
- 2)नवीन नोंदणी वर क्लिक करा.
- 3)आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 4)अर्ज सबमिट करा आणि अर्ज कन्तक मिळवा
- 5)अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासा.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
- 1)जवळच्या कामगार कल्याण केंद्राला भेट द्या.
- 2)अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे संताप्र करा.
- 3)अर्ज सबमिट करा आणि पावती मिळवा.
- 4)अर्जाची स्थिती संबंधित कार्यालयात तपासा.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
bandhkam kamgar yojana online registration महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा लाभ हा ममिळत असतो, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या दैनदिन गरजा भागवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना कार्यरत आणली आहे.
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…