Farmer Unique ID 2025: केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार कार्डसारखे युनिक ओळखपत्र बनवले आहे. कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतीच ही माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून सरकार देशभरातील शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे जेणेकरून त्यांना आधार प्रमाणेच एक युनिक ओळखपत्र (ID) जारी करता येईल.
सरकारी योजनांसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी ‘अॅग्री स्टॅक’ बनवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्री स्टॅक प्रोग्राम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे; अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.
या कार्डमुळे किमान आधारभूत किंमत (MSP) आणि शेतकरी क्रेडिट कार्डसारख्या योजनांसाठी अर्ज करताना पडताळणीची गुंतागुंत कमी होण्यात मदत होईल. या ओळखपत्राविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

फार्मर युनिक आयडी असा मिळणार लाभ Benefits of Farmer Unique ID
- फार्मर आयडी असेल तरच पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार.
- एकाच पर्यायांमध्ये अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार.
- डिजिटल पद्धतीने पीक व पिकांच्या मर्यादेनुसार KCC कर्ज मिळणार.
- शेतातील माती मृदा आरोग्य बद्दल योग्य माहिती समजून घेता येणार.
- पिकावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव याचा अंदाज समजून घेता येणार.
- शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज, पिक विमा , हमीभाव व खरेदी साठी मदत होणार.
- सुलभ पद्धतीने कृषी कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होणार.
शेतकरी ओळखपत्र मिळण्यासाठी असणारी पात्रता
- 1) सदर शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.
- 2) सदर शेतकऱ्याकडे शेतजमीन असून शेतीच्या सात बारा उताऱ्यावर त्या शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे.
- 3) अर्जदार शेतकऱ्याची पीएम किसान योजना अंतर्गत लाभार्थी असावा.
- 4) शेतकऱ्याकडे आठ अ नमुना असणे आवश्यक आहे.
- 5) शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असावे.
- 6) सदर शेतजमिनीत शेतकऱ्याने स्वतः पीक घेतलेले असणे आवश्यक आहे
फार्मर युनिक आयडीसाठी लागणारी कागदपत्रे Farmer Unique ID Required Documents
- १) आधार कार्ड
- २) शेतीचा सर्व्हे नंबर
- ३) आधार कार्ड ला लिंक असणारा मोबाईल नंबर
Farmer Unique ID अर्ज कोठे करावा ?
– फार्मर आयडी बनवण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येईल.
तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, कोतवाल यांची बैठक घेऊन प्रशिक्षण देण्यात आले असून. २६ जानेवारी दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी नोंदणी करण्यासाठी शिबिरे घेण्यात आली होती. तरी नोंदणी न केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करून घ्यावी.
Farmer ID Card Online Link | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |