शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना मिळत आहेत सायकल; जाणून घ्या काय करावे लागणार तुम्हाला | Cycle Vatp Yojana Maharashtra 2025

By Chaughule Mahesh

Published on:

Free Cycle Vatp Scheme Maharashtra 2025: महाराष्ट्र शासनाने शिक्षण हक्क अधिक प्रबळ करण्यासाठी आणि शाळकरी मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी “सायकल वाटप योजना” सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना या योजनेचा लाभ देण्यात येतो, ज्यामुळे त्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी सोय आणि प्रोत्साहन मिळते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सायकल वाटप योजनेचे महत्त्व:

सायकल वाटप योजना ही ग्रामीण भागातील मुलांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. शाळा दूर असल्याने अनेक मुलांना शिक्षण घेणे कठीण होते. ही योजना केवळ शिक्षणाचा मार्ग सुलभ करत नाही तर मुलांच्या शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Cycle vatap योजना कोणी सुरू केली?

ही योजना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राबवली जाते. राज्यातील ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून राज्य सरकारने ही योजना कार्यान्वित केली. विशेषतः पुणे समाज विकास विभागाद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जाते.

सायकल अनुदान योजना महाराष्ट्र ची उद्दिष्ट्ये

  • 1) महाराष्ट्र राज्यातील गरजू मुलींना घरातून शाळेत व शाळेतून घरी येण्यासाठी सायकल वाटप करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे जेणेकरून मुलींना शिक्षणासाठी मैलोनमैल पायी चालत जाण्याची गरज भासणार नाही. व त्यामुळे मुलींच्या महत्वपूर्ण वेळेची बचत होईल.
  • 2),या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दुर्गम भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल वाटप करणे जेणेकरून मुली शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • 3) महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांची शाळा सोडण्याचा दर कमी करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना नावाची योजना सुरू केली आहे.

सायकल वाटप योजनेचा उद्देश

  • 1) विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सहजता आणि सुविधा उपलब्ध करून देणे.
  • 2) मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
  • 3) ग्रामीण भागात शाळा गाठण्यासाठी येणाऱ्या वेळ आणि श्रम कमी करणे.
  • 4) शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
  • 5) विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे

Cycle vatap scheme अटी

  • 1) सायकल वाटप योजनेचा लाभ केवळ इयत्ता 8वी ते 12वीत शिकणाऱ्या मुलींना देण्यात येईल.
  • 2) या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मुलीच्या शाळेचे घरापासून अंतर 5 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • 3) सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल व त्या वरील सायकलच्या खरेदीसाठी लाभार्थी मुलीस स्वतः जवळची रक्कम भरावी लागेल.
  • 4) महाराष्ट्राच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • 5) लाभार्थी मुलीला इयत्ता 8वी ते 12वी या 4 वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय राहील.
  • 6) गरजू मुलींना सायकल वाटप करताना जी गावे/वाड्या/तांडे/पाडे हे डोंगराळ व अतिदुर्गम भागात आहेत जिथे जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत तथा वाहतुकीची पुरेशी साधने नाहीत/व्यवस्था उपलब्ध नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना प्राधान्य देण्यात येईल.
  • 7) सायकल वाटप योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • 8) मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • 9) सायकल च्या देखभालीचा खर्च लाभार्थ्यास स्वतः करावा लागेल शासनाकडून यासाठी कोणतेच आर्थिक आर्थिक सहकार्य दिले जाणार नाही.

Free cycle scheme लाभार्थी कोण?

  • 1) ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी (विशेषतः इयत्ता ५वी ते १०वीतील).
  • 2) ज्या विद्यार्थ्यांचे घर आणि शाळेतील अंतर किमान २ किलोमीटर किंवा त्याहून अधिक आहे.
  • 3) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार असणे आवश्यक.
  • 4) प्रामुख्याने मुली, तसेच गरजू मुलांनाही लाभ दिला जातो.
  • 5) मागील परीक्षेत किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.

सायकल वाटप योजनेअंतर्गत समाविष्ट शाळा

  • 1) शासकीय शाळा
  • 2) जिल्हा परिषद शाळा
  • 3) शासकीय अनुदानित शाळा
  • 4) तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना हि योजना लागू करण्यात येईल.

सायकल वाटप योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करण्याचे टप्पे

1) पहिला टप्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डी.बी.टी. (Direct Benefit Transfer) द्वारे 3500/- रुपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येईल.

2) दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित 1,500/- रुपये थेट अदा करण्यात येईल.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 1) अर्जदाराचा आधार कार्ड
  • 2 ) रहिवासी प्रमाणपत्र
  • 3) उत्पन्न प्रमाणपत्र
  • 4) शाळेचे ओळखपत्र / प्रमाणपत्र
  • 5) पालकांना संमतीपत्र
  • 6) पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 7) जन्म प्रमाणपत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र
  • 8) खाते तपशील

अर्ज कुठे करावा?

free cycle vatap scheme form

  • 1)अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शाळा व्यवस्थापन किंवा संबंधित पंचायत कार्यालयात करता येतो.
  • 2) शाळा व्यवस्थापन किंवा पंचायत समितीकडून अर्जाचा फॉर्म भरून तो आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
  • 3) जिल्हा शिक्षण अधिकारी किंवा तालुका शिक्षण अधिकारी कार्यालयातही अर्ज प्रक्रिया केली जाते.
  • 4) अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करण्यासाठी, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक माहिती व कागदपत्रे जोडावी

लाभार्थी निवड प्रक्रिया:

  • 1) अर्जदारांनी अर्जासोबत सर्व कागदपत्रे वेळेत सादर करणे आवश्यक.
  • 2) शाळा व्यवस्थापन समितीकडून अर्जांची प्राथमिक छाननी केली जाते.
  • 3) तालुका आणि जिल्हा स्तरावर अर्जांची तपासणी आणि मान्यता दिली जाते.
  • 4) लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करून त्यांना सायकलचे वाटप केले जाते.

पालकांना समजावण्यासाठी काही मुख्य मुद्दे:

  • 1) योजना कशी कार्य करते: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मुलांना अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडे संपर्क साधा.
  • 2) शाळा सोडण्याचे प्रमाण कमी: सायकलमुळे मुलांना शाळेत पोहोचणे सोपे होते. त्यामुळे मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
  • 3) शासनाचे पाठबळ: ही योजना संपूर्णपणे शासनाच्या पाठबळावर आधारित असल्याने कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींची चिंता करण्याची गरज नाही.
  • 4) शिक्षणात सातत्य: सायकलमुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता येते आणि शिक्षणात सातत्य राखले जाते.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now

Leave a Comment