Mobile Shop on E-Vehicle 2025: दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल) महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांनी केले आहे.
(Divyang Yojana Online Form) दिव्यांग व्यक्तीना पुरेशा सोयी उपलब्ध करुन देवून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी, अर्ज करण्यासाठी पोर्टल २२ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरू करण्यात आले आहे.
या योजनेत लाभ घेण्यासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग व वित्त विकास महामंडळाने केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
- 1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- 2)अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40 टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक/सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा.
- 3) अर्जदाराकडे अपंगत्वाचे UDID Certificate असणे बंधनकारक आहे.
- 4) अर्जदाराचे वय 18 ते 55 या दरम्यानच्या वयोगटातील असावा.
- 5) अर्जदार मतिमंद असल्यास त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
- 6 ) दिव्यांग अर्जदाराय पापिया उत्पन्न ए. 2.00 ला पेक्षा अधिक नसावे.
- 7)लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.
- 8) अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याचा (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- 9) अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच सबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- 10) लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात जिल्हानिहाय केली जाईल.
- 11)अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे /महामंडळे यांचा कर्मचारी/सेवेत नसावा.
- 12) या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.
- 13)राज्यातील इतर कोणत्याही योजने अंतर्गत मोफत ई-व्हेईकल प्राप्त झालेल्या दिव्यांग लाभार्थीस सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो (15kb ते 100kb)
- अर्जदाराची सही (3kb ते 30kb)
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
- रहिवासी पुरावा (Address Proof)
- UDID प्रमाणपत्र (UDID Certificate)
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate)
- ओळखपत्र (Identity Proof) (उदा. आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड इत्यादी.)
- बँक पासबुक (Bank Passbook)
- अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र (Applicant’s Affidavit)
टिप – अनु. 3 ते 10 पर्यंत ची सर्व कागदपत्रांची साईज कमीमकती 10 व जास्तीस जास्त-100KB दरन्यान असावी, व कागदत्राचे फॉरमॅट jpeg, jpg, png and pdf मध्ये असावे. या साईज मध्ये फॉर्म भरण्या आगोरच कागदपत्र बनवुन घेतल्यास सोईचे होईल.
अर्ज ऑनलाइन कसा करावा
- 1) सर्वात आगोदर खाली दिलेल्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा.
- 2) त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना काळजीपुर्वक वाचुन घ्याव्यात.
- 3) यानंबर मोबाईल नंबर टाकुन, ओटीपी इंटर करुन वापरकर्त्याची नोंदणी करा.
- 4) नोंदणी झाल्यावर एप्लीकेशन पोर्टल वरती लॉगीन करा.
- 5) त्यानंतर आपल्यासमोर सदरील योजनेबाबतचा एक फॉर्म दिसेल, त्यात दिलेली माहिती आधी सविस्तरपणे वाचुन घ्या.
- 6) त्यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती अचूक भरा.
- 7) फार्ममधील भरलेली माहिती आगोदर एकदा बारीक तपासून घ्या.
- 8) आता तुमचा ऑनलाईन फॉर्म सबमिट करा.
- 9) त्यानंतर फॉर्म ऑनलाईन सबमिट केल्याची पोचपावती जतन करुन ठेवा.
- 10) अशा सोप्या पद्धतीने तुम्ही अपंग मोफत रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
निष्कर्ष
अपंग व्यक्ती कोणावरही अवलंबुन राहु नये, व कुटूंबातील व्यक्तींना त्यांच्या अंपगत्वाचे ओझे वाटु नये व त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या व दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी बनावे या उध्देशाने महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना पर्यावरण पुरक फिरत्या वाहनावरील दुकान (Mobile Shop on E-Vehicle) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने अपंग व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे सुरु झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना हा लेख शेअर करायला विसरु नका, आपला एक शेअर अपंग व्यक्तीचे जिवनमान उचावण्यास मदत करेल.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |