भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते या योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सन २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.
योजनेचे नाव | स्वाधार योजना माहिती मराठी |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | समाज कल्याण विभाग |
लाभार्थी | अनुसूचित जात व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी |
लाभ | शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य |
उद्देश | विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
योजनेची आधीकृत वेबसाईट | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देणे.
- समाजातील मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा प्रसार करणे.
- स्वाधार योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात शिक्षण पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व राज्याचा विकास करू शकतील.
स्वाधार योजनेचे वैशिष्ट्य:
- राज्यातील जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यांच्यासाठी स्वाधार योजना एक फायद्याची ठरणार आहे कारण या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.
- योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
स्वाधार योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर (इयत्ता 11वी, पदवी, पदव्युत्तर पदवी) शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधीत विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी | महसूल विभागीय शहर व क वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी | उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी | |
भोजन भत्ता (वार्षिक) | 32000/- रुपये | 28000/- रुपये | 25000/- रुपये |
निवास भत्ता (वार्षिक) | 20000/- रुपये | 15000/- रुपये | 12000/- रुपये |
निर्वाह भत्ता (वार्षिक) | 8000/- रुपये | 8000/- रुपये | 6000/- रुपये |
एकूण (वार्षिक) | 60000/- रुपये | 51000/- रुपये | 43000/- रुपये |
- वरील रकमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील/विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5000/- रुपये व
- अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.
स्वाधार योजने अंतर्गत दिले जाणारे लाभ
- स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असेल अशा गरीब विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
- बाबासाहेब भीमराव आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थी घेऊ शकतात.
- लाभार्थी विद्यार्थ्यांना घर, राहणे आणि इतर खर्चासाठी शासनाकडून दरवर्षी 51000ची आर्थिक मदत दिली जाईल.
- स्वाधार योजनेंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये अभ्यास सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
- आणि तुम्ही डिप्लोमा प्रोफेशनल आणि नॉन-प्रोफेशनल कोर्समध्ये अर्ज करण्यास पात्र असाल.
स्वाधार योजनेच्या अटी
- विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
- विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
- गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
स्वाधार योजनेचा फायदा:
- भत्ता लाभ: दुसऱ्या राज्यात इयत्ता 11वी, इयत्ता 12वी, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक विषयाचे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता दिला जातो,
- शिक्षण पूर्ण करता येईल: अनुसूचित जाती, नवबौध्द वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थी स्वाधार योजनेच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
- स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
- पुस्तके आणि अभ्यास साहित्य: विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तके आणि अभ्यास साहित्यासाठी 5000/- रुपये पर्यंतची अतिरिक्त आर्थिक मदत मिळते.
स्वाधार योजनेअंतर्गत लाभाचे वितरण:
विद्यार्थ्यांचा प्रवेश ज्या वसतिगृहाशी संलग्न करण्यात आला आहे त्या वसतिगृहाचे गृहप्रमुख / गृहपाल विद्यार्थ्यांने घेतलेल्या प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे संबंधीत महाविद्यालयाकडुन उपस्थितीचा अहवाल प्राप्त करुन संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना सादर करतील व संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सदर योजनेतील पात्र प्रत्येक तिमाही उपस्थितीच्या आधारे अनुज्ञेय रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT Portal मार्फत जमा करतील. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी त्यांचा आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्यात येईल.DBT Portal सुरु होईपर्यत प्रचलित पध्दतीने सदरचा लाभ विद्यार्थ्यांच्या नांवे RTGS पध्दतीने त्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.विद्यार्थ्यांने संबधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेंतर्गत अनुज्ञेय होणाऱ्या रक्कमेपैकी पहिल्या तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल.या योजनेंतर्गत लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्याची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अदा करण्यात येईल.जे विद्यार्थी व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता या योजनेचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेतील निर्वाह भत्याचा लाभ मिळणार नाही.विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असणे आवश्यक राहील, याबाबत संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडून प्रत्येक तिमाही उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
स्वाधार योजनेच्या अटी व शर्ती:
- राज्य: फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ दिला जातील.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- जातीचा प्रवर्ग: स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थी स्थानिक नसावा. (विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा)
- शैक्षणिक गुण: इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य असेल.
- इयत्ता 12वी नंतरच्या दोन वर्षाकरीता जास्त कालावधी असलेल्या पदवीका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 12वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिर्वाय आहे.
- दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPA चे गुण असणे आवश्यक राहील.
- अभ्यासक्रमाचा कालवधी: इयत्ता 12वी नंतर पदवीका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदवीका अभ्यासक्रमाचा कालवधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
- दिव्यांगांना आरक्षण: स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील.
- वार्षिक उत्पन्न: अर्जदार विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अभ्यासक्रम: विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकिय शिक्षण परिषद/वैद्यकिय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधीकारी यांच्या मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा.
- अर्जदार विद्यार्थी स्वतःच्या शहरात घराजवळ शिक्षण घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल निवडलेला विद्यार्थी संबंधीत अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
- अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थी इयत्ता 11वी, इयत्ता 12वी आणि त्यानंतरचे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
- लाभार्थी विद्यार्थ्याने मधीच स्वतःचे शिक्षण सोडल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेमधून बाहेर केले जाईल.
- प्रवेशित विद्यार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसांचे आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहिल.
- सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यतच देय राहिल. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकुण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल.
- विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करित असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
- या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल.
स्वाधार योजनेसाठी अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे
१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :
योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.
- कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालय जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर स्वतःच Username Email आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.(अर्जदार विद्यार्थ्याजवळ Username आणि Password नसल्यास स्वतःची नवीन नोंदणी करावी लागेल)