किसान आयडी कार्ड कसे बनवावे | Farmer ID Card All information in 2024

By Chaughule Mahesh

Updated on:

Farmer ID Card All information in 2024

काय आहे शेतकरी डिजिटल आयडी?

शेतकरी डिजिटल आयडी हे एक 12 अंकांचे एक खास ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. ही आयडी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आयडी कार्ड म्हणून वापरता येईल. शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोहचवण्यासाठी हे डिजिटल आयडी उपयोगी पडेल. लाभाची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यात टाकता येईल. शेतकरी योजना, अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे आयडी कार्ड महत्त्वाचे ठरेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पाच कोटी शेतकऱ्यांचा डाटा तयार

केंद्र सरकारच्या या उपक्रमांमध्ये आत्तापर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार झाला आहे. पुढील काळात देशातील सर्व शेतकऱ्यांच्या माहितीचा डाटाबेस तयार केला जाईल अशी अपेक्षा आहे. पी एम किसान सन्मान योजना, सॉईल हेल्थ कार्ड, प्रधानमंत्री पिक विमा योजना या संबंधित असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे डाटा एकत्रित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय, रासायनिक खते मंत्रालयं, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि इतर मंत्रालयाकडून माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा

या डाटाबेसच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करायची, कोणत्या प्रकारचे बी बियाणे वापरायचं कधी लागवड करावी, त्याची कापणी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल. शेतीसंबंधी विविध विकास योजना सुरु करण्याबाबत सरकारला या डाटाबेसची मदत होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल साठवायचा आहे किंवा विकायचा आहे, कुठे कोणत्या किमतीला विक्री करायची आहे या संबंधी माहिती या डाटाबेसच्या आधारे उपलब्ध होऊ शकते.

‘फार्मर आयडी’ कोणासाठी बनणार?

डिजिटल क्रश मिशन अंतर्गत, केंद्र सरकार संपूर्ण भारतातील सर्व शेतकरी बांधवांना डिजिटल ओळख देण्यासाठी ‘फार्मर आयडी’ बनवत आहे. केंद्र सरकार या अभियानांतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊ इच्छित आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना भारत सरकारच्या कृषी विषयक योजनांचा योग्य लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘फार्मर आयडी’ तयार झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीशी संबंधित सर्व कामे अगदी सहज करता येतील. शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोठेही जाण्याची गरज भासणार नाही आणि सर्व योजनांचा लाभ त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय मिळणार आहे.

देशातील ६ कोटी शेतकऱ्यांना फायदा

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आधार कार्डसारखी युनिक शेतकरी आयडी कार्ड योजना (Unique Farmer ID Card Scheme) राबवत आहे. यामुळे देशभरातील ६ कोटी शेतकऱ्यांना (6 crore farmers) लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. गुजरातसह इतर राज्यांमध्येही ही सुविधा सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ अधिक सोप्या पद्धतीने मिळेल.

योजनांचा लाभ घेणे होईल सोपे

देशात शेतकर्‍यांच्या कल्याणासह कृषी क्षेत्रासाठी अनेक प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारे चालवत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रत्येक सीझनमध्ये मेहनत घ्यावी लागते.

ओळखपत्र तयार झाल्यानंतर या योजनांचा लाभ घेणे त्यांना सोपे होईल.
कृषी योजनांमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे सुद्धा होतात, ज्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेतात.
ओळखपत्र बनल्यानंतर अशा लोकांची भीती शेतकर्‍यांना राहणार नाही.
शेतकर्‍यांना शेती संबंधी अनेक प्रकारची माहिती सुद्धा याच माध्यमातून देता येईल.
डिजिटल कृषी मिशनच्या या प्रयत्नाने कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल.

शेतकरी ओळखपत्र मिळण्यासाठी असणारी पात्रता

1) सदर शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.

2) सदर शेतकऱ्याकडे शेतजमीन असून शेतीच्या सात बारा उताऱ्यावर त्या शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे.

3) अर्जदार शेतकऱ्याची पीएम किसान योजना अंतर्गत लाभार्थी असावा.

4) शेतकऱ्याकडे आठ अ नमुना असणे आवश्यक आहे.

5) शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असावे.

6) सदर शेतजमिनीत शेतकऱ्याने स्वतः पीक घेतलेले असणे आवश्यक आहे.

शेतकरी ओळखपत्र लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

1) सदर शेतकऱ्याचा रहिवासी दाखला

2) शेतकऱ्याकडे असलेला शेतीचा सात बारा उतारा

3) शेतकऱ्याचे आधार कार्ड

4) शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक

5) शेतजमिनीचा आठ अ नमुना

6) असल्यास किसान क्रेडिट कार्ड

7) शेतकऱ्याचे बँक पासबुक

8) शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो

9) शेतकऱ्याचे प्रतिज्ञापत्र

10) नोंदणी करतेवेळी मागितलेली इतर कागदपत्रे.

Farmer ID Card Online Link येथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Farmer ID Card Online Apply कसे करायचे?

Step 1: अधिकृत वेबसाइटवर जा

Farmer ID Card Online Apply करण्यासाठी, तुम्हाला https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

Step 2: अर्जदाराचे नाव आणि माहिती भरा

वेबसाइट उघडल्यानंतर, “किसान आयडी कार्ड” च्या अर्ज फॉर्मवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, आणि इतर संबंधित माहिती भरावी लागेल.

Step 3: जमिनीचे दस्तावेज अपलोड करा

शेतकऱ्यांचे 7/12 उतारे आणि मालकी हक्काचे इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करा.

Step 4: अर्ज सबमिट करा

सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि पुढील पावती नंबर नोट करून ठेवा. या पावतीवरून तुम्ही अर्जाचा स्थिती तपासू शकता.

Leave a Comment