शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर 10 हजाराचे मिळणार अनुदान, बघा संपूर्ण माहिती | Free tokan Yantra Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Free Tokan Yantra Yojana Maharashtra 2025: फ्री टोकन यंत्र योजनेची संपूर्ण माहितीशेतकरी बांधवांनो Free Tokan Yantra Yojana 2025 हि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राबविली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी हि योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना सर्वात महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. जर पेरणी हि वेळेवर आणि योग्य पद्धतीने झाली तर वर्षाच्या शेवटी उत्पादन सुद्धा तेवढेच चांगले होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत हि सुद्धा सुरु आहे. या योजनेमार्फत पात्र लाभार्त्याला जास्तीत जास्त 10 हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

योजनेचा उद्देशगरीब आणि अल्पभूदारक शेतकऱ्यांना या योजनेमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत करणे. तसेच युवापिढी ला सुद्धा शेतीकरण्याकरता प्रोत्साहित होतील.

हेही वाचा – पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची माहिती आली समोर | PM Kisan Yojana 20th Installment new Updates

Free tokan yantra योजनेची पात्रता निकष

शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या स्वतःच्या नावाने शेती असावी. या आधी फ्री टोकन योजनेचा लाभार्थी नसावा. अल्पभूदारक शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.लागणारे कागदपत्रडिजिटल सातबारा उताराआठ- अ होल्डिंग उताराटोळकं यंत्राचा टेस्ट रिपोर्टयंत्राचे कोटेशनविक्रेत्यांचे डिलरशिप असल्याचे प्रमाणपत्र.

हेही वाचा – शेतकरी मित्रांना मिळणार 5 लाख रुपये | Vihir Anudan Yojana 2025 in Marathi

पात्र झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे

ओरिजनल बिलआरटीजीएस पावतीडिलिव्हरी चलानयोजनेचे फायदेपहिला फायदा तर शेतकऱ्यांना या योजने मार्फत अनुदान स्वरूपात 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच लाभार्थी वेळेवर आपल्या शेतामध्ये पेरणी करू शकेल, दुसऱ्या वर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. मिळणाऱ्या टोकन यंत्राच्या साहाय्याने तूर, सोयाबीन, हरभरा सारख्या बियाणांची पेरणी एकटा शेतकरी करू शकेल.

हेही वाचा – बांधकाम कामगारांना मिळणारं या १३ वस्तू मोफत | Bandhkam Kamgar Safety Mofat Essential kit Yojana

Free tokan yantra scheme अर्ज पद्धती

Free Tokan Yantra Yojana चा अर्ज शासनाचे अधिकृत पोर्टल महाडीबीटी पोर्टलवर भराव लागेल. त्यासाठी तुमचे त्या पोर्टलवर खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तयार करून घ्यावे. पोर्टल वरती गेल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लीक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करतांना सोबतच कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जेवहा तुम्ही पात्र व्हाल तेव्हाच सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

Leave a Comment