HSRP Number Plate Information in Marathi: महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी वाहनधारकांना 531 रुपये ते 879 रुपये खर्च येईल, अशी माहिती महाराष्ट्र परिवहन विभागाने दिली आहे. या किंमतीत नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आणि वस्तू व सेवा कर (GST) देखील समाविष्ट आहे. परिवहन विभागाने बुधवारी पेमेंट लिंक सुरू केली आहे.
HSRP म्हणजे काय?
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) या टॅम्पर-प्रूफ असतात व त्यामध्ये अद्वितीय ओळख क्रमांक, लेझर-एच्च केलेला कोड आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये असतात. यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि वाहनांसंबंधित गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
HSRP बसवणे अनिवार्य आहे का?
परिवहन विभागाच्या आदेशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांच्या मालकांनी त्यांच्या वाहनांवर HSRP बसवणे अनिवार्य आहे.
HSRP प्लेटची वैशिष्ट्य
- हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही.
- यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही.
- त्यामुळे वाहनाची सुरक्षा वाढते. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही.
- एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते. (HSRP Number Plate Yojanasandhi)
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
प्लेटिंग सक्तीचे आहे का आहे?
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ च्या नियम ५० नुसार, वाहनावर HSRP लावणे सक्तीचे आहे. या कायद्यांतर्गत एकूण ६ प्रकारच्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक आहे.
- १) नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
- २) ट्रान्सपोर्ट वाहने
- ३) भाडेतत्त्वावर असलेली वाहतूक वाहने
- ४) बॅटरीवर चालणारी रेंट अ कॅब असलेली वाहने
- ५) बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने
- ६) बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने
नवीन वाहनांव्यतिरिक्त जुन्या वाहनांवरही ते बसवणे आवश्यक आहे.
कोणत्या वाहनांसाठी किती खर्च?
दुचाकी (ट्रॅक्टर, बाईक, स्कूटर) : 531 रुपये
तीनचाकी (ऑटो-रिक्षा) : 590 रुपये
चार चाकी (कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो, ट्रेलर इत्यादी) : 879 रुपये
ही सर्व माहिती राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी ‘अपॉइंटमेंट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाइटवर वाहनांच्या प्रकारानुसार HSRP दर देखील नमूद केले आहेत. यावर 18% जीएसटी लागू होईल.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या किंमती किती असणार :
दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी: 200 मिमी X 100 मिमी आणि 285 मिमी X 45 मिमी आकाराच्या प्लेटची किंमत 219.9 रुपये
चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी: 500 मिमी X 120 मिमी आणि 340 मिमी X 200 मिमी आकाराच्या प्लेटची किंमत 342.41 रुपये
हेही वाचा –
• Ladaki Bahin Yojana 3.0 कधी सुरू होणार
• लाडकी बहिण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक कराल
• लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच 10,500 रुपये जमा, सविस्तर माहिती जाणून घ्या
HSRP Number ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया
1. अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार संबंधित कार्यालय निवडावे.
2. वाहनाची माहिती आणि Vahan डेटाबेसमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करावा.
3. HSRP फिटमेंट सेंटर निवडून सोयीस्कर तारीख व वेळ निश्चित करावी.
4. HSRP फी ऑनलाइन भरावी आणि निवडलेल्या तारखेला सेंटरवर जाऊन HSRP बसवून घ्यावी.
5. सेंटरवर जाऊन बसवून घ्यायची नसेल तर तुम्ही होम डिलिव्हरीचा पर्यायही निवडू शकता. हा पर्याय निवडल्यास गाडीला नंबरप्लेट घरी येऊन बसविण्यात येईल.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |