HSRP Number Plate Last date: महाराष्ट्रमध्ये महायुतीच्या सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या गाड्यांना HSRP number plate नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे तरी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 31 मार्च ठेवली होती. त्यात मुदत वाढ करून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे .
HSRP number plate साठी कोणाला रजिस्ट्रेशन करावं लागणार ?
आता वाहनांना HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर बसवावे लागणार आहे.ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2019 नंतर झालेले आहे.
त्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवलेले आहे.ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2019 पूर्वी केलेले आहेत्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे .
Number plate साठी अंतिम तारीख काय ?
महाराष्ट्रमध्ये महायुतीच्या सरकारने वाहनांना HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर बसवने सक्तीचे केले आहे.ही number plate बसवण्यासाठी काही ठराविक कालावधी दिला होता.तो कालावधी संपत आला तरी देखीलवाहनांना HSRP नंबर प्लेट बसवले गेले नाही. त्यामुळे सरकारने तो कालावधी वाढवण्याचे ठरविले. व त्यात मुदत वाढ केली.
आता HSRP नंबर प्लेट बसवन्यासाठी 30 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देण्यात आली आहे 30 एप्रिल पूर्वी वाहनाची नंबर प्लेट बदलून घ्या, नाहीतर होईल कारवाई.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटचा काय फायदा होणार ?
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट चे अनेक फायदे आहेत.चोरी रोखणे, बनवट नंबर प्लेट मुळे होणाऱ्या वाहन चोरीच्या घटना कमी होण्यास मदत होते.पोलिसांना व प्रशासनाला वहाने ट्रॅक करणे सोपे होते.
हेही वाचा – HSRP नंबर प्लेट नाहीय; तर तुम्हाला एवढे भरावे लागेल चलन
रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे
- 1) आधारकार्ड
- 2) गाडी नंबर
- 3) चेसिस नंबर किंवा इंजिन नंबर (दोन्हीपैकी एक)
- 4) रजिस्टर मोबाईल नंबर
कोणत्या वाहनांसाठी किती खर्च?
दुचाकी (ट्रॅक्टर, बाईक, स्कूटर) : 531 रुपये.
तीनचाकी (ऑटो-रिक्षा) : 590 रुपये.
चार चाकी (कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो, ट्रेलर इत्यादी) : 879 रुपये
ही सर्व माहिती राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी ‘अपॉइंटमेंट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबसाइटवर वाहनांच्या प्रकारानुसार HSRP दर देखील नमूद केले आहेत. यावर 18% जीएसटी लागू होईल.