जिवंत सातबारा मोहीम योजना आहे तरी काय? शेतकऱ्यांवर योजनेचा काय होणार परिणाम जाणून घ्या!

By Chaughule Mahesh

Updated on:

Jivant Satbara Mohim: शेतकऱ्यांना सातबारा बद्दल खरेदी विक्री करताना बऱ्याचशा अडचणी येत असतात. बरेचशे जमीन खरेदी विक्री व्यवहार हे रखडले जातात. सातबारा वरील मयतांच्या नावे असलेली जमीन खरेदी विक्री करताना या जिवंत सातबारा मोहीम याचा उपयोग होणार. चला तर आपण आज जाणून घेऊया कशाप्रकारे आहे ही योजना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Satabara Yojana महत्त्व

सातबारा उतारा म्हणजे (७/१२) हा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीबद्दलची सर्वांत महत्त्वाची नोंद आहे. यात जमिनीच्या मालकाचे नाव, जमिनीचा वापर, क्षेत्रफळ, तारण हक्क, महसूल आणि जमीन कर्जाच्या नोंदी यांचा समावेश असतो. या कागदपत्रामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काची अधिकृत माहिती मिळते, जी कर्ज मिळवणे, जमीन व्यवहार किंवा शासकीय योजनांसाठी महत्त्वाची असते. पारंपारिक पद्धतीत ही नोंद अद्ययावत करणे खूप वेळखाऊ आणि त्रासदायक असायचे, ज्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना अडचणी येत.

जिवंत सातबारा योजनेची वैशिष्ट्ये

ऑनलाइन अद्ययावत प्रक्रिया: जमिनीवरील कोणतेही बदल झाले की, ते डिजिटल पद्धतीने तत्काळ नोंदवले जातात. यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयात न जाता ही माहिती मिळवता येते.वेळ आणि मेहनत वाचवणारी: शेतकऱ्यांना वेळेत सातबारा उतारा मिळतो, ज्यामुळे त्यांना कार्यालयात वारंवार जाण्याची गरज पडत नाही.पारदर्शकता: जिवंत सातबारा योजनेमुळे जमीन नोंदीत पारदर्शकता येते. कोणतीही जुनी किंवा चुकीची नोंद राहात नाही.

भ्रष्टाचारावर आळा: सातबारा ऑनलाइन अद्ययावत केल्यामुळे त्रुटी आणि भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते.तंत्रज्ञानाचा वापर: डिजिटल पद्धतीने रिअल-टाइम अपडेट्स मिळाल्याने प्रक्रिया जलद, अचूक आणि विश्वासार्ह होते.

जिवंत सातबारा मोहीम फायदे

शेतकऱ्यांसाठी सुलभता: कर्ज घेणे, जमीन व्यवहार करणे किंवा शासकीय योजनांसाठी सातबारा उतारा सहज उपलब्ध होतो.मालकी हक्काचे संरक्षण: नोंदी वेळेवर अद्ययावत केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण होते, जमीन विवाद टाळले जातात.गुंतवणुकीसाठी सोपे: अद्ययावत सातबारा गुंतवणूकदारांना विश्वासार्हतेची हमी देतो, ज्यामुळे जमीन व्यवहार सुलभ होतात.

जिवंत सातबारा मोहीम कधीपासून राबविण्यात येणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत १ एप्रिलपासून राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद अभिलेखामध्ये नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment