Ladaki Bahin Scheme new update 2025: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती. परंतू काही कारणाने बऱ्याचश्या बहिणींना अजूनही फॉर्म भरूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात दिले जात होते. परंतू महिलांनी जर या या पुढील गोष्टींकडे लक्ष दिल्यास त्या योजने पासून वंचित नाही राहणार.
लाडक्या बहिणींनी घ्यावयाची काळजी
१. आधार लिंकिंग: सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे बँक खात्याशी आधार कार्डचे लिंकिंग नसणे. अनेक महिलांच्या बँक खात्यांशी त्यांचे आधार कार्ड जोडलेले नसल्यामुळे डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रक्रिया अडचणीत येत आहे.
२. वैयक्तिक खाते: ज्या महिलांनी अर्जामध्ये संयुक्त बँक खात्याचा (पती-पत्नी) तपशील दिला आहे, त्यांना देखील हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. योजनेच्या नियमानुसार केवळ वैयक्तिक खात्यांमधूनच रक्कम वितरित केली जाते.
३. चुकीची माहिती: अर्जामध्ये भरलेली बँक खात्याची माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास देखील पैसे जमा होण्यास अडचणी येतात.
लडक्या बहिणींनी करायचे सर्व प्रथम हे सर्व कामे
१. आधार लिंकिंग:
- बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे हे काम प्राधान्याने करावे.
- आधार लिंकिंगशिवाय पैसे मिळणार नाहीत.
२. वैयक्तिक खाते: संयुक्त खातेधारक महिलांनी स्वतःचे वैयक्तिक खाते उघडावेनवीन खात्याची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपडेट करावीखाते आधार कार्डशी लिंक करावे
३. माहिती तपासणी: अर्जातील सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून पहावीबँक खात्याचा तपशील अचूक असल्याची खात्री करावीकोणतीही त्रुटी आढळल्यास त्वरित दुरुस्त करावी.
पैसे वितरणाची प्रक्रिया
शासनाकडून योजनेचे पैसे प्रथम बँकांकडे पाठवले जातात. त्यानंतर बँका डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थींच्या खात्यात हस्तांतरित करतात. २९ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात तिसऱ्या हप्त्याचे औपचारिक वितरण सुरू होणार आहे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
या गोष्टींकडेही लक्ष असू द्या!
- तुम्हाला DBT द्वारे पैसे पाठवण्यात आलेले आहे, म्हणजे सरकारने पैसे आधार कार्डला जे बँक खाते संलग्न आहे त्यावर पाठविले आहे परंतू
- काहींचे ते DBT enable खाते बंद आहे,• काहींच्या बँक खात्यांना आधार लिंक आहे परंतू DBT लिंक नाही याकडेही लक्ष असू द्या.
- तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तो मंजूर (Aprove) पण झालेला आहे, तरही तुम्हाला पैसे आले नाहीत.
- बऱ्याचश्या महिलांनी फॉर्म भरते वेळी जे बँक खाते दिले आहेत ते जॉइंट खाते आहेत. त्याची तरतूद अशी की, ते वैयक्तिक खाते असणे आवश्यक आहे..
बहिनिंसाठी महत्त्वाच्या टिप्स
१. मोबाईल अपडेट्स:
- बँकेकडून येणारे एसएमएस नियमित तपासावेत
- खात्यातील व्यवहारांवर लक्ष ठेवावे.
- कोणतीही शंका असल्यास बँकेशी संपर्क साधावा.
२. दस्तऐवज:
- सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत
- आधार कार्ड, बँक पासबुक यांच्या प्रती जपून ठेवाव्यात.
- योजनेशी संबंधित सर्व पत्रव्यवहार जतन करावा
३. नियमित संपर्क:
- स्थानिक प्रशासनाशी संपर्कात रहावे.
- योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर नियमित भेट द्यावी.
- महत्त्वाच्या सूचना व अपडेट्सची नोंद ठेवावी.
- सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नविन झालेले बदल
- दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही.
- तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही.
- म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी !
निष्कर्ष
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. तिसऱ्या हप्त्याच्या वितरणात येणाऱ्या अडचणी तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, योग्य त्या कार्यवाहीनंतर त्या सहज दूर होतील. Ladaki Bahin Yojana new Updates 2025 महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली बँक खाते व आधार तपशील अद्ययावत ठेवावा आणि शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |