का झाल्यात 5 लाख बहिणी अपात्र; जाणून घ्या कारण | Ladaki Bahin Scheme Update February

By Chaughule Mahesh

Updated on:

Ladaki Bahin Scheme Update February: आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात दिले जात होते. निवडणुकीपूर्वी या योजनेसाठी बहुतेक अर्ज भरणाऱ्या महिलांना सरसकट पात्र ठरविले गेले होते. मात्र, आता निवडणुकीपूर्वी महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या योजनेत नवे निकष लागू केले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानुसार 5 लाख महिला लाभार्थी अपात्र ठरतील.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :

  • संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
  • वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
  • एकुण अपात्र महिला – ५,००,०००

सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे!

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment