लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्यांना मिळणार पैसे; अंगणवाडी सेविकांचा पाडवा होणार गोड | Ladaki Bahin Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Maharashtra Ladaki Bahin Yojana Today Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि सर्वत्रच अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली. वेगवेगळ्या ठिकाणाहून या योजनेचे अर्ज भरले गेले. त्यामध्ये वैयक्तिक, महानगरपालिका ,विविध प्रकारचे पोर्टल, नारीशक्ती दूत ॲप, अशा प्रकारे एकूण पाच लाख अर्ज भरले गेले. त्यापैकी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांनी अर्ज भरले होते .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या अर्जांची प्रत्येकी 50 रुपये रक्कम शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे आणि पाडव्यापूर्वी ही संबंधितांच्या खात्यात जमा होणार आहे. याशिवाय इतर मार्गाने भरलेल्या भरलेल्या अर्जांसंदर्भात पन्नास रुपये मानधनाची कोणीही मागणी न केल्यामुळे त्यांचे मानधन आलेले नाही.

Ladaki Bahin Yojana

विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरूण देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ३१.३३ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज

पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे (एनयुएलएम) समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, शहर मिशन मॅनेजर, ग्रामसेवक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून आठ लाख ८८ हजार ९४२ लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते.

सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून ५० रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे. Ladaki Bahin Yojana March Update

Leave a Comment