Ladaki bahin yojana April month Installment | लाडकी बहीण योजना; मोठी बातमी

By Chaughule Mahesh

Updated on:

ladaki bahin yojana April month Installment: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून लाडक्या बहिणी चर्चा अशी सुरू आहे, कारण लाडक्या बहिणींना मागील नऊ महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची पैसे जमा होत आहेत. परंतु येत्या पुढील महिना म्हणजे एप्रिल महिना. एप्रिल महिन्यातही लाडक्या बहिणीला दहावा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरु केली होती. या योजनेत आत एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान, आता एप्रिल महिन्याला हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो.

लाडक्या बहि‍णींना एप्रिलचा हप्ता कधी येणार?

महिला १० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल, अशा चर्चा होत होत्या. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.लाडकी बहीण योजनेत गेल्या ३-४ महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यातदेखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात.

एप्रिलचा हप्ता लांबणार कारण काय?

लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लांबण्याचीदेखील शक्यता आहे. आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे २ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या अर्जांची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता महागणार आहे. अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

९ लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी केली जात आहे. या योजनेत तब्बल ९ लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फेब्रुवारीपर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद केले होते. ही संख्या अजून वाढण्याचीदेखील शक्यता आहे.

लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरुन 2100 कधी होणार?

राज्य सरकार जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2 कोटी 52 लाख महिलांना 1500 रुपयांप्रमाणे द्यायचे असल्यास साधारणपणे 46 हजार कोटींचा खर्च एका वर्षात लागणार आहे. जर, महायुतीनं या खर्चाची रक्कम 2100 रुपये केल्यास एका आर्थिक वर्षात 64000 कोटी रुपयांचा खर्च सरकारला करावा लागेल. त्यामुळं राज्य सरकार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2100 रुपयांची तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील म्हणाले. त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे. वर्षभराचे लाडक्या बहिणींचे 1500 किंवा 2100 रुपये अ‍ॅडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं.

नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो Ladaki Bahin Yojana April update and installment अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Ladaki bahin yojana April month Installment | लाडकी बहीण योजना; मोठी बातमी”

Leave a Comment