लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? केवायसी करण्याची शेवटची तारीख काय? | Ladaki Bahin Yojana

By Chaughule Mahesh

Updated on:

ladaki bahin yojana e-kyc updates: लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि इ-केवायसी करण्याची मुदत, त्यात येणारे अडथळे या सर्व गोष्टींचा आपण आज या आर्टिकल मध्ये आढावा घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिला आता सप्टेंबर महिन्याच्या ₹१,५०० हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता काहीसा उशिराने मिळाल्यानंतर, सप्टेंबरचा हप्ता वेळेवर येईल अशी आशा होती.

मात्र, ऑक्टोबर महिना आला तरी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पुढील काही दिवसांत तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.

या वेळी 3000 रुपये येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे या ऑक्टोबर महिन्यात येऊ शकतात अशी शक्यता आहे. या दरम्यान आपल्याला केवायसी ही करायची आहे. केवायसी करण्याची मुदत तुम्हाला अजूनही आहे परंतु केवायसी करताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत…

हेही वाचा: नमो शेतकरी सन्मान निधी योजना, ६ हजार ऐवजी ९ हजार मिळणार का? Namo Shetkari Yojana

Ladaki Bahin Yojana e-kyc Last date

लाडकी बहीण योजना आपल्याला केवायसी करायची आहे. किंवा केवायसी करताना खूप अडचणी येत आहेत, परंतु या अडचणीला माध्यमातून आपल्याला केवायसी ही पूर्ण करायची आहे. कारण ही केवायसी करण्यासाठी आपल्याला दोनच महिने मुदत आहे.

हप्ता लांबणीवर जाण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण

सप्टेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर न येण्यामागे अनेक प्रशासकीय कारणे असू शकतात, परंतु त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया अनिवार्य करणे.

ई-केवायसी बंधनकारकः सरकारने सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक केले आहे.

लाभ थांबणारः प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचे सप्टेंबर महिन्याचे आणि पुढील सर्व लाभ थांबवले जातील.

हप्ता कधी मिळणार? ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि संबंधित महिलांचा डेटा अपडेट झाल्यावरच सप्टेंबरचा हप्ता बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी करणे का आणि कसे महत्त्वाचे आहे?

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. लाभ अखंडितः ई-केवायसी केल्यास, तुमचे नाव लाभार्थी यादीत कायम राहते आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹१,५०० मिळण्याची खात्री होते.

हेही वाचा: लाडक्या बहिणींना का करावी लागणार e-KYC घ्या जाणून कारण | Ladaki Bahin Yojana e-KYC updates

मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या?

योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ मिळावा यासाठी, आता सर्व महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने एक खास पोर्टल देखील विकसित केले आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या:

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. तज्ञांच्या माध्यमातून यावर उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी होईल, याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.”

हेही वाचा: Ladaki Bahin Yojana: e-KYC स्टेप बाय स्टेप या पद्धतीने करा | e-KYC करताना येणाऱ्या अडचणी

ई-केवायसी करणे का आणि कसे महत्त्वाचे आहे?

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • ई-केवायसीचे महत्त्वः ई-केवायसी केल्यास, तुमचे नाव लाभार्थी यादीत कायम राहते आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹१,५०० मिळण्याची खात्री होते.
  • बनावट नोंदींना प्रतिबंधः या प्रक्रियेमुळे योजनेत होणारे गैरव्यवहार आणि बनावट नोंदींना प्रतिबंध घालता येतो.
  • पैसे थांबणारः जर तुम्ही विहित वेळेत ई-केवायसी केली नाही, तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुमचे पैसे थेट थांबवले जातील.
WhatsApp Group Join Now

Leave a Comment