लाडकी बहिण योजना जानेवारी अपडेट्स | Ladaki Bahin Yojana January 2025 Updates

By Chaughule Mahesh

Updated on:

Ladaki Bahin Yojana January 2025 Updates Information in Marathi: जानेवारी महिन्यामध्ये महिलांना मिळणारं ३००० रूपये, कसे आणि का मिळणारं जाणून घेऊयात आपण पुढे. त्याचबरोबर बहिणींना २१०० रूपये कधी पासून जमा होणार याची माहती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाडकी बहिण योजना समोर आलेली महिती

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेंतर्गत तब्बल 25 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 84 लाख महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत लाडक्या बहिणींना जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.

दरम्यान आता या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये होतोय. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे आणि याच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे दिले जातील असे म्हटले जात आहे.

काय आहे? लाडकी बहिण योजनेचे जानेवारी महिन्याचे अपडेट्स

मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याने नक्कीच ही लाडक्या बहिणीसाठी एक मोठी भेट करण्याची शक्यता आहे. जानेवारीचे पैसे येत्या काही दिवसांनी खात्यात जमा झाले तर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करता येईल अशी आशा आहे

लाडक्या बहिणीला कधी मिळणार २१०० रूपये

आम्हाला मिळालेल्या महितीनुसार मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना २१०० रूपये मिळण्याची शक्यता आहे.

३००० रूपये कसे मिळणारं बहिणीला?

काही महिलांना डिसेंबर महिन्याचे अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, त्या महिलांना जनेवारी महिन्यांचे १५०० आणि डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये असे दोन्ही मिळून असे ३००० रूपये मिळणारं आहेत.

बहिणींना मकर संक्रांतीचा अगोदर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment