नक्की २१०० रुपयांमागचे सत्य काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Ladaki Bahin Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki Bahin Yojana March Today Update : निवडणुकीच्या काळात दिलेले ते आश्वासन पूर्ण करायला पाच वर्षे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमूद केले तर आर्थिक शिस्त लक्षात घेत योग्य निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची रक्कम देण्यावर विचार सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अनुदानांची रक्कम किती असेल याबाबत शिस्त हवी असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. अर्थसंकल्पात विकासासाठी भांडवली गुंतवणूक किती आणि अनुदाने किती याची सांगड राखावी लागते असेही त्यांनी नमूद केले. अर्थसंकल्पानंतर झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रपरिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करणार असल्याचं म्हटलं होतं. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपये देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं म्हटलं होतं.

महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात 2100 रुपये देणार असं कुठंही म्हटलं नसून जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. याशिवाय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सूचना आल्यास विभाग 2100 रुपयांचा प्रस्ता तयार करेल, असं म्हटलं होतं.

लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरुन 2100 कधी होणार?

राज्य सरकार जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2 कोटी 52 लाख महिलांना 1500 रुपयांप्रमाणे द्यायचे असल्यास साधारणपणे 46 हजार कोटींचा खर्च एका वर्षात लागणार आहे. जर, महायुतीनं या खर्चाची रक्कम 2100 रुपये केल्यास एका आर्थिक वर्षात 64000 कोटी रुपयांचा खर्च सरकारला करावा लागेल. त्यामुळं राज्य सरकार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2100 रुपयांची तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील म्हणाले. त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे. वर्षभराचे लाडक्या बहिणींचे 1500 किंवा 2100 रुपये अ‍ॅडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं.

लाडकी बहिण योजनेबद्दल आदिती तटकरे काय म्हणाल्या?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 च्या संदर्भातील आपण त्यानिमित्तानं उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत, किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी कुठं केलेलं नाही. राज्याची एखादी योजना जाहीर करत असतो.

शंभर टक्के देणार, जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेला नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन असेल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.

नवीन अर्थसंकल्पात विचार केला जाईल

अदिती तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. नवीन अर्थसंकल्प… आपण ज्यावेळी रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो, त्या वर्षाच्या कुठल्याही कालावधीत होत नसतात. आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली, त्यावेळी सुद्धा ती योजना अर्थसंकल्पात आणली होती आणि तिथून ती सुरू झाली होती. त्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी येईल, ज्यावेळी अर्थसंकल्प तयार केला जाईल. त्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय त्यावेळी निश्चितपणे घेतला जाईल.’

लाडकी बहिणीला कधीपर्यंत मिळत राहणार 1500 रुपये

अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचे मानधन १५०० रुपयांवरून २१०० करण्याची तरतूद केली जाईल. त्यासाठी वाढीव निधीची तरतूद केली जाईल आणि नंतर याची अंमलबजावणी होईल. म्हणजे ३ मार्च २०२५ पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयेच मिळणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. Ladaki Bahin Yojana Today Update

Leave a Comment