लाडक्या बहिणींनो तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही! तर लगेच करा हे काम | ladaki bahin yojana may installment

By Chaughule Mahesh

Published on:

ladaki bahin yojana may month installment: लाडकी बहीण योजनेचा हा ११वा हप्ता होता, बऱ्याचशा बहिणींना हा हप्ता मिळाला आहे. काही बहिणींना अजूनही ११वा हप्ता अजून जमा झालेलं नाही तर त्याबद्दल हे काही अपडेट. आणि या खालील गोष्टींकडेही लक्ष द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मे महिन्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीत?

मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत, तसेच त्याबाबत कोणती घोषणा देखील झालेली नाहीये, मे महिन्याचा हाफ्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हेही वाचा – तुम्हाला मिळणार का ११ वा हप्ता लाडक्या बहिणीचा जाणून घ्या | Mazi ladaki bahin yojana Today May month Updates

जून महिन्याच्या १२व्या हप्त्याच काय?

दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे मे चा हाफ्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

हेही वाचा – रेशन धारकांना खुशखबर ! पुढील ३ महिन्यांचे राशन मिळणार एकदाचं, काय आहे शासनाच्या निर्णय | Rashan Card new Updates

योजनेचे पैसे कोणाला मिळतील?

  • हे पैसे त्या महिलांना मिळतील: ज्या महाराष्ट्रात राहतात.ज्यांचं वय २१ ते ६५ वर्षांपर्यंत आहे.
  • ज्या महिला गरिब आहेत आणि कर (Tax) भरत नाहीत.
  • ज्यांचं कुटुंब वर्षाला ₹2.5 लाखांपेक्षा कमी कमावतं.
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नाही (ट्रॅक्टर चालेल).
  • ज्यांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे.
  • आणि ज्या इतर सरकारी पेन्शन योजना घेत नाहीत.

Ladaki bahin Yojana अर्ज मंजूर झाला की नाही, कसं पाहायचं?

  • १. योजनेची वेबसाइट उघडा.
  • २. “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
  • ३. आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका.
  • ४. “Application made earlier” वर क्लिक करा.
  • ५. ₹ चिन्हावर क्लिक केल्यावर तुमच्या हफ्त्याची माहिती दिसेल.

हेही वाचा – या तीन पोस्ट बँकेच्या योजना बनवणार तुम्हाला लखपती | Post Bank of India Scheme 2025

यादीत आपलं नाव कसं शोधायचं?

  • १. आपल्या शहर किंवा गावाच्या वेबसाइटवर जा.
  • २. “माझी लाडकी बहिण योजना यादी” वर क्लिक करा.
  • ३. आपलं गाव, वॉर्ड आणि ब्लॉक निवडा.
  • ४. “View List” वर क्लिक करा.
  • ५. यादी PDF मध्ये उघडेल – त्यात आपलं नाव शोधा.

या लोकांना पैसे मिळणार नाहीत – तुमचं नाव आहे का?

माझी लाडकी बहीण योजना माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या हातून सुरू झाली. या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये बँकेत जमा होतात. पण सध्या या योजनेत काही बदल झाले आहेत.शासनाने ठरवलं आहे की या योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांची सखोल तपासणी होणार आहे. ज्यांना या तपासणीत अपात्र ठरवलं जाईल, त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की काही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.तपासणी नंतर सुमारे ४० लाख महिला या योजनेतून वंचित राहू शकतात.

उदा. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल, त्या अपात्र ठरतील. तसेच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे १,१०,००० महिलाही या योजनेतून वगळल्या जाणार आहेत.

हेही वाचा- लाडक्या बहिणींना मिळणार 40,000 रुपयांचे लोन; तुम्हाला कसे मिळणार जाणून घ्या प्रोसेस | ladaki bahin loan yojana

काही महिलांचे अर्ज का फेटाळले?

राज्य सरकारने ५ लाख अर्ज नाकारले आहेत.जर अर्जात चुकीची माहिती दिली असेल किंवा पात्रता नसेल, तर हफ्ता मिळत नाही.

  • ✅ आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे खूप महत्वाचं आहे.
  • ✅ अर्जात दिलेली माहिती खरी आणि बरोबर असली पाहिजे.
  • ✅ जर हफ्ता मिळत नसेल, तर लगेच वेबसाइटवर माहिती तपासा.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

तुम्हाला आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते कसे तपासायचे?

  • १. https://uidai.gov.in या वेबसाईटला जा.
  • २. “आधार लिंकिंग स्टेटस” किंवा “Bank Seeding Status” यावर क्लिक करा.
  • ३. तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाका, नंतर ओटीपीने लॉगिन करा.
  • ४. येथे तुम्हाला कळेल की तुमच्या आधार कार्डाशी कोणते बँक खाते लिंक आहे.
  • ५. जर तुमचं खाते लिंक नसेल, तर जवळच्या बँकेत जाऊन लिंक करून घ्या.
  • योजनेत पैसे मिळाल्यावर बँकेतून एसएमएस येईल, त्यामुळे पैसे जमा झाले की लगेच कळेल.

Leave a Comment