Ladaki bahin yojana may installment: लडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची मोलाची योजना ठरलेली आहे, या योजनेच्या महिलांना मागच्या दहा हफ्त्यांनी खूप मोलाचा हातभार दिला आहे. आता महिला अकरावा हप्त्याची वाट बघत आहेत. आणि तोही हप्ता लवकर जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार
या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल आता माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता २ मे २०२५ रोजी जमा झाला होता.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याचा हप्ता मे मध्येच जमा होण्याची शक्यता आहे. आज १३ मे २०२५ असून, पुढील पंधरा दिवसांत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळू शकतो. Ladaki bahin yojana may month installment
मे महिन्याचा हप्ता कोणत्या आठवड्यात मिळणार
अकराव्या हप्त्याची रक्कम मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून या योजनेचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत जमा होत आहे. त्यामुळे या महिन्यातही त्याच वेळेत पैसे जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) करतील, असा दावा केला जात आहे. Ladaki bahin yojana May month 11th installment
Ladaki bahin yojana मे महिना अपात्रतेचे निकष
ज्या महिला स्वतः शासकीय सेवेत आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे, त्या देखील या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील. ट्रॅक्टर (Tractor) वगळता, ज्या महिलांच्या कुटुंबाकडे इतर कोणतेही चारचाकी वाहन आहे, अशा महिलांनाही या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
थोडक्यात, वर नमूद केलेल्या अपात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना मे (May) महिन्यापासून पुढील हप्ते मिळणार नाहीत. May month installment date
हेही वाचा – या योजनेअंतर्गत महिलांना मिळतात ५ लाख रुपये; तर आजच करा अर्ज | lakhpati didi yojana Maharashtra
‘या’ महिलांना मिळणार ३ हजार रुपयांचा हप्ता
मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना ३ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजेच दहावा हप्ता मिळालेला नाही, त्यांना दहावा आणि अकरावा, असे दोन्ही महिन्यांचे मिळून ३ हजार रुपये एकत्र दिले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. मात्र, ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला आहे, त्यांना नेहमीप्रमाणे फक्त १५०० रुपयांचा हप्ता मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरुन 2100 कधी होणार?
राज्य सरकार जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2 कोटी 52 लाख महिलांना 1500 रुपयांप्रमाणे द्यायचे असल्यास साधारणपणे 46 हजार कोटींचा खर्च एका वर्षात लागणार आहे. जर, महायुतीनं या खर्चाची रक्कम 2100 रुपये केल्यास एका आर्थिक वर्षात 64000 कोटी रुपयांचा खर्च सरकारला करावा लागेल. त्यामुळं राज्य सरकार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2100 रुपयांची तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील म्हणाले. त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे. वर्षभराचे लाडक्या बहिणींचे 1500 किंवा 2100 रुपये अॅडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो
Ladaki Bahin Yojana May update and installment अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
3 thoughts on “मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार | Ladaki bahin yojana may installment”