Ladaki Bahin Yojana new update February : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? समोर आले नवीन अपडेट

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki Bahin Yojana new update February: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या १५०० रुपये दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने हा निधी २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले असले तरी, वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न वारंवार महिलांकडून विचारला जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेत्यांनी बजेट सादर झाल्यानंतर महिलांना २१०० रुपये मिळतील, असे संकेत दिले होते. परंतु, अद्याप कोणतेही ठोस पत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला वाढीव हप्त्यासाठी प्रतीक्षेत आहेत. अशातच आता राज्याचे अर्थसंकल्प ३ मार्च रोजी सादर होणार असल्याचे म्हणले जात आहे. त्यामुळे ३ मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

दरम्यान, लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana Marathi ) बंद होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगू लागल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट आम्ही महिलांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत” असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाचे म्हणजे, लाडकी बहिणी योजनेअंतर्गत (Ladaki Bahin Yojana) २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आता महिलांच्या आशा या अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांकडे लागल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेच्या रकमेचा आकडा वाढवण्यात येईल अशी आशा व्यक्त केले जात आहे. यामुळे आता राज्यभरातील महिलांचे लक्ष ३ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत.

Ladaki Bahin Yojana February अर्ज प्रक्रिया आणि पात्रता

ऑक्टोबर २०२३ पर्यंत या योजनेसाठी अर्ज स्वीकारले गेले. ज्या महिलांनी वेळेत अर्ज केले, त्यांना त्यांच्या अर्जाच्या महिन्यापासून लाभ मिळत आहे. योजनेची पात्रता आणि निकष यांची काटेकोर तपासणी करून लाभार्थींची निवड करण्यात आली आहे.लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच त्यांच्या सामाजिक स्थानातही सुधारणा होत आहे. नियमित उत्पन्नामुळे त्या कुटुंबातील महत्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी होऊ शकत आहेत.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख जवळ आली

लाडकी बहीण योजनेसाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत, त्यांनी दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अर्जात दुरुस्ती करावी. अन्यथा, फेब्रुवारी महिन्यानंतर त्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळणार नाही.

हेही वाचा –

• Ladaki Bahin Yojana 3.0 कधी सुरू होणार

• लाडकी बहिण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक कराल

• लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच 10,500 रुपये जमा, सविस्तर माहिती जाणून घ्या

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment