Ladaki Bahin Yojana Reverification: लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आढळल्यास त्यांना थेट अपात्र करण्यात येणार आहे. राज्य सरकारने पात्र आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभमिळावा, यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरु केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील तब्बल 22 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज अपूर्ण असल्याने किंवा चुकीची माहिती भरल्याने हे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी
महिला व बालकल्याण विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. 4 फेब्रुवारी 2025 पासून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करतील. त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे का याची लाभार्थी महिला तसेच त्या भागातील इतर रहिवाशांकडून माहिती घेतील. लाभार्थी महिलेच्या घरातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे आढळून आल्यास त्या महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे.
विभक्त राहणाऱ्या महिलांना सवलत
जर लाभार्थी महिला पती किंवा मुलांसोबत वेगळी राहत असेल आणि घरातील इतर सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल, तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील. मात्र, हे योग्य पुराव्यांच्या आधारे सिद्ध करावे लागेल.
Ladaki Bahin Yojana पात्रता
- ✅ महिला राज्याची कायम रहिवासी असावी.
- ✅ वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
- ✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- ✅ कोणत्याही कुटुंबातील सदस्याने आयकर भरलेला नसावा किंवा सरकारी नोकरीत नसावा.
- ✅ कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन नसावे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
लाडकी बहिण योजनेचा अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख जवळ आली
लाडकी बहीण योजनेसाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत, त्यांनी दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अर्जात दुरुस्ती करावी. अन्यथा, फेब्रुवारी महिन्यानंतर त्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळणार नाही.
फेब्रुवारी २०२५ चा आठवा हप्ता कधी जमा होणार?
दरमहा पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 अनुदान जमा होते. लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर जमा होणार आहे. राज्यातील गरीब आणि आर्थिक दुर्बल महिलांसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |