Ladaki Bahin Yojna:काय म्हणाले पवार साहेब..? लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार २१०० रुपयेयाच योजनेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं. ‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणे अवघड जात आहे. मंडळी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबातील महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये थेट जमा केले जातात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत एकूण ९ हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
निवडणुकीतील आश्वासन आणि सद्यस्थिती
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत आल्यावर महिलांना १,५०० ऐवजी २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन झाले, मात्र या वाढीव रकमेबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये याबाबत उत्सुकता असून, त्या २,१०० रुपये कधीपासून मिळतील याची प्रतीक्षा करत आहेत.
लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरुन 2100 कधी होणार?
राज्य सरकार जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2 कोटी 52 लाख महिलांना 1500 रुपयांप्रमाणे द्यायचे असल्यास साधारणपणे 46 हजार कोटींचा खर्च एका वर्षात लागणार आहे. जर, महायुतीनं या खर्चाची रक्कम 2100 रुपये केल्यास एका आर्थिक वर्षात 64000 कोटी रुपयांचा खर्च सरकारला करावा लागेल. त्यामुळं राज्य सरकार कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2100 रुपयांची तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील म्हणाले. त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे. वर्षभराचे लाडक्या बहिणींचे 1500 किंवा 2100 रुपये अॅडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं.
योजनेचा या महिलांना लाभ मिळणार नाही
ज्या महिलांचा परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलाकडे चार चाकी वाहन आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल. ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता लाडक्या बहीणीचा लाभ घेता येणार नाही.
हेही वाचा – अजितदादांकडून योजनेबद्दल मोठी अपडेट; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
लाडकी बहिन योजनेची महाराष्ट्रातील पेमेंटची स्थिती कशी तपासायची?
लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा. आता, लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी स्थिती पृष्ठ उघडेल जिथे तुम्ही नोंदणी क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाद्वारे माझी लाडकी बहिन योजनेची स्थिती तपासू शकता. मोबाइल क्रमांक पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर, गेट मोबाइल ओटीपी बटणावर क्लिक करा.