Ladaki Bahin Yojana not received money: माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत लाडक्या बहिणींना लाभ मिळतो. परंतु काही अपात्र महिला किंवा काही बहिणींना २-३ हप्ते मिळाले आणि नंतर एकही हप्ता जमा झालेला नाही अशा महिलांसाठी या गोष्टी करणे आवश्यक आहे. चला तर मग करून घ्या हे काम…
- सर्वात अगोदर ladaki bahin yojana official website open करून घ्या.
- त्यानंनंतर, डाव्या बाजूला हेल्पलाईन नंबर आहे.
- त्यावर कॉल करून
- फॉर्म बद्दल काय झाले?, हप्ता कधी जमा होणार?, फॉर्मचा स्टेटस काय?,
- या सर्व गोष्टी तुम्ही कॉल करून विचारू शकता.

- पुढे अर्जदार लॉगिन म्हणून पर्याय आहे , त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट मध्ये लॉगिन होऊ शकता.
- लॉगिन करण्यासाठी ज्यांचे पण येथे अकाउंट आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागून घ्यावा.
- त्यानंनंतरच ते login होईल.

- आता login झाल्यानंतर तक्रार या पर्यायावरती क्लिक करून, आपल्याला तक्रार करायची आहे.

- आता आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे.
- त्यानंतर तक्रार प्रकार मध्ये COMPLETE AGAINST OTHER APPLICATION हा पर्याय सिलेक्ट करून घ्यायचा आहे.

- यानंतर पुढे तक्रार श्रेणीमध्ये OTHER हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे.

- आता यानंतर नवीन होम स्क्रीन येईल
- त्यामध्ये अर्ज क्रमांक, तुमचे नाव, पत्ता, मतदारसंघ, पिनकोड
- इत्यादी अशा प्रकारच्या सर्व माहिती भरून घ्यायचं आहे.

- यानंतर खाली आलो की,
- थोडसं स्वतःबद्दल वर्णन करायचे आहे, म्हणजे तुमचे नाव आणि आधार क्रमांक,
- आणि थोडासा तपशील टाकायचा आहे, तो पुढीलप्रमाणे:
- मी सर्व अटी शर्ती व पात्रता मध्ये बसत असून मला जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीं. कृपया माझ्या तक्रारीची दखल घ्यावी ही विनंती.
- नंतर कॅपचा भरून भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.

- फॉर्म सबमिट झाल्यावरती तुमचा ग्रीव्हियन्स नंबर आणि कंप्लेंट सबमिट झाली आहे असा मेसेज येतो.

अशाप्रकारे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने तक्रार करू शकता.
तक्रार तुम्ही कॉल करूनही करू शकता, आणि या पद्धतीने फॉर्म भरूनही तक्रार करू शकता.
या लोकांना पैसे मिळणार नाहीत – तुमचं नाव आहे का?
माझी लाडकी बहीण योजना माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या हातून सुरू झाली. या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये बँकेत जमा होतात. पण सध्या या योजनेत काही बदल झाले आहेत. शासनाने ठरवलं आहे की या योजनेत लाभघेत असलेल्या महिलांची सखोल तपासणी होणार आहे. ज्यांना या तपासणीत अपात्र ठरवलं जाईल, त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की काही महिला या योजनेचा लाभघेऊ शकणार नाहीत. तपासणी नंतर सुमारे ४० लाख महिला या योजनेतून वंचित राहू शकतात.
उदा. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल, त्या अपात्र ठरतील. तसेच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे १,१०,००० महिलाही या योजनेतून वगळल्या जाणार आहेत.













