lakhpati didi yojana 2025: बहिणींनो लाडकी बहीण योजना जशी सध्या कार्यरत आहे अशाप्रमाणे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने लखपती योजना सुरू केली होती. ही योजना बचत गटांद्वारे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली योजना आहे. तर या योजनेचे उद्दिष्टे, फायदे, अर्ज करण्याची प्रक्रिया ही सर्व माहिती आज आपण बघणार आहोत.
काय आहे लखपती दीदी योजना?
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जाते. आता या योजनेच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आले आहे.
Table of Contents
कधी झाली योजनेची सुरुवात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरु केली आहे.
Lakhpati Didi योजनेचा उद्देश काय?
महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
हेही वाचा – महिलांना मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज | Mahila Udyogini loan Yojana
काय आहे योजनेची पात्रता?
लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यांमंध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहेत. पात्रतेचे सामान्य निकष खालीलप्रमाणे या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी.त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 (तीन लाखांपेक्षा) कमी असणे आवश्यक. महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
कोणती कागदपत्र लागणार?
लखपती दीदी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- उत्पन्न प्रमाणपत्र,
- पत्त्याचा पुरावा,
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र,
- पासबूक,
- मोबाईल नंबर,
- पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे.

पाच लाख रुपयांपर्यंत कशी मिळणार मदत
महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभाकरण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
लखपती दीदी योजनेचा मोठा फायदा
लखपती दीदी योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते. तसेच व्यवसाय सुरू करण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यापर्यंत मदत केली जाते. लखपती दीदी योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्जासह कमी खर्चात विमा सुविधेची तरतूदही करण्यात आली आहे. महिलांना कमाईसोबत बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
हेही वाचा – एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख फिक्स; लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी
योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
महिला कशा होणार लखपती?
लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही टिप्स दिले जातील. त्याचबरोबर आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप्स, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते. त्याचबरोबर व्यवसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्विस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते.
अर्ज कसा करणार?
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना ‘स्वयं मदत गट’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडं पाठवण्यात येईल. या अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केलं जाईल. सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील. lakhpati didi yojana online apply maharashtra
लखपती दीदी योजना अधिकृत वेबसाइट
lakhpati Didi yojana official website 👉 👉https://lakhpatididi.gov.in/
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो…
लखपती दीदी योजना Lakhpati Didi yojana maharashtra योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभाकरण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते, जी महिलांना उद्योजक-व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करते.
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा