lek ladaki yojana june Updates: राज्यात दिनांक १ एप्रिल, २०२३ पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक ३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णय जून २०२५
- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये या योजनेची जाहिरात प्रसिध्दी करण्याकरिता माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक २ व ३ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती.
- त्याप्रमाणे जाहिरात प्रसिध्दीची कार्यवाही करण्यात आल्यानंतर संबंधितांची देयके अदा करण्यास मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांचेकडून संदर्भाधीन क्रमांक ४ येथील पत्रान्वये प्राप्त झालेला होता.
- त्यापैकी काही देयके अदा करण्याकरिता रु. ३.५० कोटी इतका निधी संदर्भाधीन क्र. ४ येथील दिनांक २१.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला आहे.

Lek Ladaki Yojana GR
Lek Ladaki योजनेतून कसा आणि किती लाभ मिळणार?
या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल.
हेही वाचा – लेक लाडकी योजना २०२५ संपूर्ण माहिती नवीन बदल | Lek Ladaki Yojana 2025 All Information In Marathi
Lek ladaki yojana अटी आणि शर्ती
- ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी आणि त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसंच, एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
- पहिल्याच्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना आई-वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यस एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, त्यानंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- १ एप्रिल २०२३ पर्वी एक मुलगा आणि मुलगी आहे आणि त्यानंतर जन्मला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील. यावेळी पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे.
हेही वाचा – महाराष्ट्र सरकारची ‘लेड लाडकी योजना’ मुलींच्या जन्मानंतर मिळणार लाखो रुपये | lek ladaki yojana 2025
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थीचा जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. (वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावं.) यासाठी तहसिलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- लाभार्थीचे आधार कार्ड
- पालकांचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- रेशनकार्ड
- मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्षे पूर्झाल्यानतंर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला.)
- संबंधित टप्प्यातील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला.
- पालकांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).
हेही वाचा – विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्यात येणार आहे; महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mahajyoti Free Tablets Yojana
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे मिळेल?
आवश्यक सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त- महिला व बालविकास कार्यालयात उपलब्ध होतील. अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावा व तो अंगणवाडी पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावा.
Lek ladaki Yojana अर्ज कुठे भरायचा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या पालकांनी १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्याची नोंद संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत करावी. त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
ऑनलाईन अर्जाची नोंदणी
ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका तर नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका यांच्याकडून लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, तपासणे, पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही होणार आहे. ग्रामीण भागात संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) तर शहरी भागात संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे अर्जाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे हे सर्व अर्ज मान्यतेसाठी सादर करतील.
अर्जावर अंतिम मंजूरी हे संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) हे व मुंबई आणि मुंबई उपनगराबाबतीत नोडल अधिकारी यांना आहेत. ते यादीस मान्यता देतील व मंजूर यादी आयुक्त, महिला व बालविकास यांना सादर करतील.
Lek ladaki योजनेचा लाभार्थी स्थलांतर झाल्यास
एखादे लाभार्थी कुटुंब योजनेतील एक अथवा काही टप्प्यातील लाभ घेतल्यानंतर राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ मिळण्यासाठी स्थलांतरीत झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकाऱ्याकडे त्यांनी अर्ज सादर करावा. याचप्रमाणे एखादे कुटुंब दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झाले असेल आणि त्यांनी योजनेतील एक किंवा काही टप्प्यातील लाभ घेतले असतील तर पुढील टप्प्यातील लाभ मिळण्यासाठी त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.