मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना मराठी | Maza Ladka Bhau Yojana Apply Online Application All Information Marathi

By Chaughule Mahesh

Updated on:

Maza Ladka Bhau Yojana Apply Online Application All Information Marathi

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसोबतच माझा लाडका भाऊ योजना (Majha Ladka Bhau Yojana 2024) या योजनेची देखील घोषणा केली होती. राज्यातील तरूणांसाठी महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना सूरू केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत व्यावसायिक कार्य प्रशिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
योजनेचे नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
सुरुवातकुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र शासन
उद्देशयुवकांना प्रशिक्षण सोबत दरमहा विद्यावेतन देणे
लाभार्थी१२ वी पास, आय.टी.आय / पदविका, पदवीधर /पदव्युतर
लाभदरमहा ६ हजार ते १० हजार विद्यावेतन
प्रशिक्षण कालावधी६ महिने
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळhttps://rojgar.mahaswayam.gov.in

माझा लाडका भाऊ योजनेचे स्वरूप –

योजनेच्या स्वरूपाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांच्यामार्फत ही योजना राबवली जाणार आहे आणि या उपक्रमा अंतर्गत विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामध्ये उमेदवाराची नोंदणी आस्थापनांची नोंदणी तसेच कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत आणि यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांची राहणार आहे.

योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक असणार आहे यासोबतच विविध ट्रेड मधून आयटीआय केलेले उमेदवार,डिप्लोमा पास उमेदवार तसेच पदविका पदवी आणि त्यासोबत पदवीधर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार देखील यामध्ये उपलब्ध असल्याने सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

माझा लाडका भाऊ योजना पात्रता काय | Maza Ladka Bhau Yojana Eligibility Criteria

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असले पाहिजे.
  • अर्जदार किमान 12 वी पास असला पाहिजे.
  • अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

लाडका भाऊ योजना मिळणारा लाभ –

  • 12वी पास उमेदवारांना महिना ६००० रुपये
  • डिप्लोमा/आयटीआय पास उमेदवारांना महिना ८००० रुपये
  • पदवीधर उमेदवारांना महिना १०००० रुपये

योजनेच्या उद्देशाबद्दल बोलताना संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे की या योजनेद्वारे राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे आणि यामुळेच तुम्ही देखील योजनेसाठी तुमचा अर्ज केला असल्यास तुमच्या ०६ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला सरकार द्वारे सदरील वेतनश्रेणी दिली जाणार आहे आणि याचा तुम्हाला चांगला लाभ होणार आहे.

माझा लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे | Majha Ladka Bhau Yojana Documents Required

  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • निवास प्रमाणपत्र
  • आधारशी लिंक बँक खाते
  • पासपोर्ट साईज फोटो
लाडका भाऊ योजना GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
लाडका भाऊ योजना अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

लाडका भाऊ योजना अर्जप्रक्रिया | How to Apply for Maza Ladka Bhau Yojana?

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांनी महास्वयम याच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • आपला अर्ज भरण्यासाठी rojgar mahaswayam gov in संकेतस्थळावर जावून आपला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी ची लिंक तुम्हाला वरती देखील देण्यात आलेली आहे.
  • लिंक वर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे.
  • सुरुवातीला यामध्ये तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करण्यासाठी बेसिक सर्व माहिती द्यायची आहे.
  • पत्ता, शैक्षणिक पात्रता याबद्दल देखील सविस्तर माहिती तुम्ही यामध्ये भरायची आहे.
  • विचारण्यात आलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड देखील तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे.
  • कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तुमचे अर्ज सबमिट करून घेतले जाणार आहेत.

Leave a Comment