Mukhyamantri mazi ladaki bahin yojana Today Updates: लाडकी बहिणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार. शासनाकडे निधी जमाही झालेला आहे. तसा GR आपण 23 तारखेला पाहिलाच आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात लाडक्या बहिणींना ११ वा हप्ता हा जमा होणार चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Table of Contents
Ladki Bahin Yojana May Installment Date
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे १० हप्ते यशस्वीरित्या जमा झाले आहेत. राज्य सरकार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात (डीबीटीद्वारे) देत असते. एप्रिल महिन्याचा १०वा हप्ता जमा झाला आहे. आता महिलांना ११ वा हप्ता मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने 335.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 23 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत तो निधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात पहिल्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो. अजून याबाबत शासनाकडून अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. पण हप्ता जमा होण्याआधीच पडताळणी सुरू झाल्याने, ज्या महिलांचे अर्ज या पडताळणीत अपात्र ठरतील, त्यांना मे महिन्याचा हप्ता जमा होणार नाही.
हेही वाचा – ११ व्या हप्त्याचा GR आला; तारीख झाली फिक्स ladaki Bahin Yojana May month GR
लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार?
मे महिना संपायला फक्त १० दिवस उरले आहेत. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल.
Ladaki bahin yojana मे महिना अपात्रतेचे निकष
ज्या महिला स्वतः शासकीय सेवेत आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहे, त्या देखील या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील. ट्रॅक्टर (Tractor) वगळता, ज्या महिलांच्या कुटुंबाकडे इतर कोणतेही चारचाकी वाहन आहे, अशा महिलांनाही या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
थोडक्यात, वर नमूद केलेल्या अपात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना मे (May) महिन्यापासून पुढील हप्ते मिळणार नाहीत. Ladaki bahin yojana May month installment date
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
काय आहे नवीन निर्णय?
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. यातील अनेक अर्जामध्ये त्रुटी आढळल्या होत्या तसेच काही महिला अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. ही फसवणूक रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आता सर्व अर्जाची पुन्हा एकदा कसून तपासणी (पडताळणी) करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीत जे अर्ज योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत, ते रद्द केले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजना GR डाउनलोड करण्यासाठी
- योजनासंधी व्हॉट्सॲप चॅनल – येथे क्लिक करा
- योजनासंधी टेलिग्राम ग्रुप – येथे क्लिक करा
या’ महिलांना मोठा दिलासा- अर्ज तपासले जाणार नाहीत!
या पडताळणी प्रक्रियेतून काही महिलांना वगळण्यात आलं आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलांकडे पिवळे (अंत्योदय) किंवा केशरी (बीपीएल) रेशन कार्ड आहे, त्यांचे अर्ज पुन्हा तपासले जाणार नाहीत.
यामागचं कारण असं की, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हे अन्न धान्य पुरवठा विभागाने जारी केले आहेत आणि ते कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिले जातात. या कार्डधारकांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असतं, हे आधीच पडताळलेलं असतं. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेच्या उत्पन्नाच्या निकषांनुसार त्या पात्र आहेत. त्यांची पात्रता आधीच सिद्ध असल्याने त्यांचे अर्ज पुन्हा तपासण्याची गरज नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे या महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता नाही आणि त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील.
हेही वाचा – मे महिन्यात मिळणार लाडक्या बहिणींना ३००० रुपये; कारण घ्या जाणून | Ladaki bahin yojana may installment
Ladaki bahin yojana ११ वा हफ्ता कसा मिळेल?
हा हफ्ता २ टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. म्हणजे सर्व महिलांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत.
- काहींना २४ तारखेला मिळतील, तर काहींना नंतरच्या दिवशी.
- पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात:
- महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
- खात्यात DBT (Direct Benefit Transfer) सुरू असणे गरजेचे आहे. म्हणजे सरकार थेट बँकेत पैसे पाठवते.
Ladaki bahin yojana अर्ज मंजूर झाला का हे कसे तपासायचे?
सुमारे ५ लाख महिलांचे अर्ज सरकारने नाकारले आहेत. आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही, हे खालील प्रकारे बघू शकता:
- योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.“अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
- आपला मोबाईल नंबर व पासवर्ड टाका.
- “Application made earlier” वर क्लिक करा.
- “₹” चिन्हावर क्लिक करा आणि आपले हफ्त्याचे स्टेटस बघा.
नमस्कार, मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….
अशा प्रकारच्या योजना नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…
योजना संधी व्हाट्सअप ग्रुप लिंक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा