अंगणवाडी सेविका खरच घरो-घरी येणार का? काय आहे या मागचे सत्य; Ladaki bahin yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Ladaki Bahin Yojana Today news: लडकी न्यूज मध्ये आतापर्यंत तुम्ही लाभ घेतला आहे परंतु आता यामागे सरकारने काही निकष लावले आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आरटीओकडून अंगणवाडी सेविकांना सव्वातीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहोचती करण्यात आली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विशेष म्हणजे या अर्जांची छाननी न झाल्याने अनेक अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता सरकारने अॅक्शन मोडवर आलं आहे. चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही चारचाकी महिलेच्या नावावर नसेल, मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून बाद केलं जाईल.

चारचाकी नावावर असलेल्यांची नावे निकषामधून काढणार

शासनाने लाभ देताना महिलांकडून हमीपत्र भरून घेतले होते. यात चारचाकी कार नसल्याचे नमूद केल्याने त्यांना लाभ देण्यात आला होता. मात्र, ज्यांच्या नावावर कार आहे, असेही लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना लाभसोडण्यासाठी आवाहन केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याने आता प्रत्यक्ष पडताळणीत अशी नावे कमी केली जाणार आहेत.

Ladaki Bahin Yojana पात्रता

  • ✅ महिला राज्याची कायम रहिवासी असावी.
  • ✅ वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.
  • ✅ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • ✅ कोणत्याही कुटुंबातील सदस्याने आयकर भरलेला नसावा किंवा सरकारी नोकरीत नसावा.
  • ✅ कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन नसावे.

५ एकर शेती, शासकीय नोकरी नको; उत्पन्नाची अट अडीच लाखाचीयोजनेच्या लाभासाठी अल्पभूधारक शेतकरी, शासकीय नोकरी, अडीच लाख रुपयांची उत्पन्नाची अट ठेवण्यात आली होती. मात्र, आता पडताळणीत निकषाची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना कमी केले जाणार आहे.

विभक्त लाडक्या बहिणींना राहणार लाभ

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती, मुलांसोबत विभक्त (वेगळी) राहत असेल, तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे.

Leave a Comment