मुख्यमंत्री वयोश्री योजना मराठी पात्रता कागदपत्रे नवीन सुधारणा | Mukhyamantri Vayoshri Yojana All Information in Marathi

By Chaughule Mahesh

Updated on:

Mukhyamantri Vayoshri Yojana All Information in Marathi

तुमच्या कुटुंबात पण जर का 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती असतील. तर त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून 3,000 हजार दिले जाणार आहे. हे पैसे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत दिले जाणार असून, या योजनेबाबतची संपूर्ण माहिती या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे. जसे की या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील. कोणते व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहतील. योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणासाठी व कशासाठी ?

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 65 वर्ष व त्या अधिक वयाची लोकसंख्येच्या 10 ते 12 टक्के इतके आहे, तर या लोकांना राज्य सरकार द्वारे त्यांच्या एका ठराविक वयाच्या नंतर म्हणजेच 65 वर्षाच्या नंतर आर्थिक मदत केली जाणार आहे, या वयोश्री योजना योजनेअंतर्गत त्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये द्या जीवनावश्यक वस्तू लागतात व त्याचप्रमाणे ते जास्त वयामुळे भरपूर विकारांनी त्रस्त असतात. त्यांना त्या वयामध्ये भरपूर शारीरिक व्याधी उद्भवलेल्या असतात.

तर त्यांचे आरोग्य हे उत्तम प्रकारचे रहावे त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावे, एक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. या अंतर्गत या सर्व 65 वर्षे व त्या पेक्षा जास्त सर्वच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे. तरीही योजना वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना सशक्त करण्यासाठी व त्यांच्या फायद्यासाठी राबवली गेलेली आहे. तरी या योजनेचा फायदा हे फक्त 65 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या दृष्टी नागरिकांना होणार आहे.

या संबंधित नुकताच महाराष्ट्र शासनाने जीआर काढला असून त्यामध्ये त्यांनी या योजनेबद्दल ची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की जे आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असणारे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही आवश्यक अशी उपकरणे लागत असतील म्हणजे चेष्मा, वोकर, व्हाईलचेअर किंवा काही गोष्टी लागत असतील तर त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठीच ही मुख्यमंत्री वयोश्री योजना ही सुरू करण्यात आली.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

1) या मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील जेष्ठ नागरिक असावा.
2) त्या नागरिकाचे वय 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
3) त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असावे किंवा आधार नोंदणी पावती असावी.
4) लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करणे.
5) उत्पन्न मर्यादा : लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
6) सदर लाभार्थी व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकार द्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्तोत्राकडून तेच उपकार विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने सुयोग घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण कार्यक्षम उपकरणे इत्यादी बदललेला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
7) पात्र लाभार्थीच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थीच्या देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था मार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थी कडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
8) निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्ये पैकी 30 टक्के महिला असतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये पात्रतेचे निकष व नियम

या योजना या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणकोणते निकष असतील याबद्दल आपण पाहूयात,

  1. जर जे कोणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व नागरिक असावे, व त्यांना ते डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावी ज्या नागरिकांचे वय 65 वर्षे व त्यावरून जास्त आहे त्यांच्याकडे तुमचे आधार कार्ड असायला हवे जर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल व दुसरे कोणतेही त्यांच्या ओळखीच्या पुराव्याचे कागदपत्रे असतील तर ती या ठिकाणी स्वीकारली जातील.
  2. त्याचबरोबर जे नागरिक या योजनेसाठी अर्ज करणार आहेत किंवा या योजनेसाठी त्यांना पात्र व्हायचं आहे अशा नागरिकांकडे जिल्हा प्राधिकरणाकडून त्यांची पात्रता सिद्ध करू शकतात किंवा त्यांचे रेशन कार्ड व इतर योजना बद्दलचे निवृत्तीवेतन असल्याचा किंवा मिळवण्याचा पुरावा देऊ शकतात.
  3. यामध्ये या योजनेसाठी म्हणजेच वयोश्री योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे रुपये दोन लाख याच्या आत मध्येच असावे त्याबद्दल सविस्तर उत्पन्नाचा दाखला व त्याबद्दल सविस्तर उत्पन्नाचा दाखला व स्वतःचे वचना पत्र सादर करणे आवश्यक आहे.
  4. जे नागरिक या योजनेसाठी पात्र होतील, त्यांनी त्यांचे वैयक्तिक आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या सेविंग अकाउंटला जोडलेले असावे कारण त्यामध्ये योजनेचे रुपये तीन हजार डीबीटी प्रणाली द्वारे डायरेक्ट वितरित केल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकांनी येणाऱ्या तीन दिवसांच्या आत मध्ये ज्या कोणत्याही मानसी आरोग्य केंद्रातून जी कोणती उपकरण खरेदी केलेली आहेत आणि त्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे जमा करणे आवश्यक आहे., तसेच हे सर्व दस्तावेज समाज कल्याण साहित्य यांनी प्रमाण किती केलेले असायला हवेत जेष्ठ नागरिकांनी सर्व कागदपत्रे पुढील 30 दिवसांच्या आत मध्ये संस्थेच्या वेबसाईट वरती अपलोड करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे वजा केले जातील.
  5. जो काही ज्येष्ठ नागरिकाचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यात 30 टक्के लाभार्थी हे महिला असतील

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

या योजनेमध्ये जे नागरिक अर्ज करू इच्छित आहेत. अशा नागरिकांना कोणकोणते आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहेत याची यादी आपण खालील प्रमाणे दिली आहे. ती सर्व कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट साईज चे फोटो दोन
  • स्वयंघोषणापत्र
  • ओळखपत्र पटविण्यासाठी असणारी अन्य कागदपत्रे

वयोश्री योजनेमध्ये मिळणारे साधने

या योजनेअंतर्गत पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना 3000 हजार रुपये खालील साधने खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत.

1चष्मा
2श्रवण यंत्र
3ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
4फोल्डिंग वॉकर
5कमोड खुर्ची
6नी- ब्रेस
7लंबर बेल्ट
8सायकल कॉलर इ.

वयोश्री योजनेसाठी अर्ज कुठे व करायचा ?

या योजनेबद्दलचा जीआर हा महाराष्ट्र शासनाने नुकताच प्रकाशित केला असून या योजनेविषयीची स्वतंत्र एक अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र शासनाकडून तयार करण्यात येणार आह. ज्यावेळेस ती वेबसाईट लाईव्ह होईल व या योजना संदर्भात अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू होईल तेव्हा आम्ही त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या ब्लॉग वरती देणार आहोत.


या योजना शिबिरासाठी जे कोणी अधिकारी नियुक्त केले गेले असतील ते जे कोणी पात्र झालेले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची सर्व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या पडताळणी करून ठेवतील तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना ई-टोकन दिले जाणार जे कोणी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हेही ई-टोकन देण्यात येईल व जे कोणी ऑफलाइन अर्ज भरतील त्यांना फक्त नोंदणी पावती दिली जाईल.


प्रशासकीय पातळीवरती या सर्व कामांचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र नागरिकांची माहिती ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पुणे येथील समाज कल्याण आयुक्त आणि मुंबईतील सामाजिक न्याय आणि विशेष विभागाकडे सुपूर्त करण्यात येईल यामध्ये पात्र असणाऱ्या किंवा झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या यादीमध्ये त्यांचे डिटेल्स जसे की फोटो, नाव, बँक खाते, आधार नंबर, बीपीएल कार्ड नंबर, या सर्व गोष्टींचा समावेश असेल व ती सर्व माहिती त्या आयुक्तालयाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसारित करण्यात येईल.


पुढील काळामध्ये या योजनेबद्दलची येणारे सर्व अपडेट्स वेळोवेळी ही आपल्याला देण्यात येईल आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला राहणाऱ्या सर्व 65 वर्षे व त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेबद्दल माहिती द्यावी व त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा.

Leave a Comment