पॅन कार्ड २.० हे सध्याच्या पॅन कार्डचे अपग्रेडेट व्हर्जन असणार आहे. या पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड दिलेला असेल. त्यामुळे तुमची सर्व माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे. तसेच नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हे काम करु शकतात.
पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय?
पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. याला पॅन 2.0 असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सरकार करदात्यांना क्यूआर कोडने सुसज्ज नवीन पॅन कार्ड जारी करेल. क्यूआर कोड असलेल्या पॅन कार्डचे वैशिष्ट्ये, यामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतील, नवीन पॅन कार्ड कसे बनवायचे याबाबत जाणून घेऊया.
पॅन कार्ड 2.0 चे उद्दिष्ट
पॅन कार्ड 2.0 चे मुख्य उद्दिष्ट सर्व करदात्यांची नोंदणी आणि सेवा सुलभ आणि जलद गतीने करणे हे आहे. तसेच करदात्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हे संपूर्ण काम इको फ्रेंडली होणार आहे. कमी खर्चात आणि ऑनलाइन पद्धतीने तुम्ही नवीन पॅन कार्ड बनवू शकतात. यामुळे डिजिटल सुविधा अपग्रेडे करण्यात आल्या आहेत.
पॅन कार्ड 2.0 चे ४ महत्वपूर्ण वैशिष्ट्ये
- १ – पॅन कार्डच एक नवीन स्वतंत्र वेब पोर्टल सुरू होणार आहे. सर्व कामे एकाच पोर्टल वरुण करण्यात येणार आहे.
- २ – येथे कोणीयतेही कागदपत्रे लागणार नाहीत, म्हणजे कमीत कमी कागद पत्रांमध्ये पेपरलेस प्रोसेस होणार आहे.
- ३ – यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे पैसे लागणार नाहीत, म्हणजे पॅन कार्डचे जे सर्व कामे होणार आहेत ते सर्व विनामूल्य होणार आहे.
- ४ – टोल फ्री नंबर असणार आहे की जो म्हणजे, तुम्हाला कुठल्याही प्रकरची अडचण किंव्हा कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास तुम्ही संपर्क साधू शकाल.
क्यूआर कोडसह पॅन कार्डची वैशिष्ट्ये
पॅन 2.0 उपक्रमांतर्गत सरकार आता क्यूआर कोड असलेले नवीन पॅन कार्ड जारी करेल. क्यूआर कोडने पॅन व्हेरिफिकेशन सोपे होईल. याशिवाय याच्या मदतीने करदात्यांची माहिती पटकन मिळेल आणि त्याची पडताळणी करता येईल. क्यूआर कोडमुळे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होईल. दरम्यान, अलिकडच्या वर्षांत आयकर विभागाकडून पॅन कार्डवर क्यूआर कोड आधीच जोडला जात आहे.
प्रत्येकाला नवीन पॅनकार्ड मिळेल का?
पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत सरकार केवळ पॅन कार्डच नाही तर संपूर्ण प्रणाली अपग्रेड करणार आहे. त्यामुळे सध्याच्या पॅनधारकांना सरकारकडूनच नवीन पॅनकार्ड दिले जाणार आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही. पॅन अपग्रेड मोफत असेल. यासाठी पॅनधारकांना कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्याची गरज नाही.
नवीन पॅनकार्डमुळे सुरक्षामध्ये काय बदल होणार
या प्रकल्पासाठी सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे सेवेचा दर्जा अधिक चांगला आणि जलद होईल. डेटा अचूक आणि एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. तसेच संपूर्ण डेटाची पडताळणी केली जाईल. डेटा सुरक्षिततेसाठी पॅन डेटा व्हॉल्ट सिस्टम असेल. तसेच तक्रार निवारण प्रणालीतही सुधारणा केली जाईल.
सध्याच्या पॅनकार्डचे काय होणार?
तुमचे पॅन कार्ड आधीच बनलेले असेल तर तुम्हाला पुन्हा नवीन पॅन कार्ड बनवण्याची गरज नाही. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पॅन 2.0 प्रकल्प सुरू झाल्यानंतरही व्यक्ती आणि व्यवसायांकडे असलेले विद्यमान पॅन वैध राहतील आणि त्यांचा जुना क्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही. नवीन अपडेटनंतरही जुने पॅन कार्ड काम करत राहील.
७८ कोटी पॅन जारी करण्यात आले आहेत
पॅन 2.0 प्रकल्प हा करदात्यांना अधिक चांगला डिजिटल अनुभव देण्यासाठी पॅन सेवांच्या तंत्रज्ञान-आधारित परिवर्तनाद्वारे करदात्यांच्या नोंदणी सेवांच्या व्यवसाय प्रक्रियेची पुनर्रचना करण्यासाठी एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे. सध्याच्या पॅन 1.0 फ्रेमवर्कचे हे अपग्रेड असेल जे पॅन व्हेरिफिकेशन सेवेला कोअर आणि नॉन-कोर पॅन/टॅन क्रियाकलापांशी देखील जोडेल, असे सरकारने निवेदनात म्हटले आहे. देशात आतापर्यंत सुमारे ७८ कोटी पॅन जारी करण्यात आले असून, त्यापैकी ९८ टक्के पॅन वैयक्तिक पातळीवर देण्यात आले आहेत.