लहान मोठ्या उद्योगासाठी मिळत आहेत 10 लाख रुपयांचे कर्ज; OBC Loan Yojana In Maharashtra

By Chaughule Mahesh

Published on:

OBC Loan Scheme 2025 In Maharashtra: ओबीसी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय़ाच्या वतीने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या धर्तीवर व्याज परतावा कर्ज योजना सुरू आहे. या योजनेतून लाभार्थींना १० लाखांपर्यंत कर्ज मिळते. या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

OBC Loan Yojana Maharashtra काय आहे

मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून OBC Loan Yojana marathi 2025 अंतर्गत ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वयंम उद्योगासाठी अनेक कर्ज योजना ह्या राबविण्यात येत आहेत. ओबीसी बांधवांना कृषी सलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग तसेच मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. obc business loan scheme in maharashtra

OBC वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रू.10 लाख पर्यंत कर्ज योजनाआण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रूपये 10 लाख रू.पर्यंतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणिवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्मत राबविण्यात येतात.

हेही वाचा – महिलांना मिळणार ३ लाख रुपयांचे कर्ज; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | Mahila Udyogini loan Yojana

पात्रतेसाठी उत्पन्न मार्यादा OBC Loan Yojana

  • सध्या महामंडळाच्या योजने करीता लाभार्थीचय पात्रतेची ग्रामीण व शहरी भागाकरीता रू.1.00 लाख कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.
  • सदर उत्पन्नमर्यादेत वाढ करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेप्रमाणे सदर योजनेकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा इतर मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या रू.8.00 लाख इतकी राहील.(सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रानुसार)

उद्देश

  • बँकेमार्फत लाभार्थीना रू. 10.00 लाख पर्यंत रक्कम वितरीत केली जाईल.
  • सदर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रकाणिकरणानुसार (जास्तीत जास्त 12% पर्यंत) महामंडळाकडून केला जातो.

लाभार्थी पात्रतेच्या अटी

  • 1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • 2. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे.
  • 3. अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • 4. महामंडळाच्या संकेतस्थळावार (वेबपोर्टल प्रणालीवर) नाव नोंदणी अनिवार्य आहे.
  • 5. अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • 6. उमेदवार कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • 7. उमेदवानाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापनगाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक

हेही वाचा – आयुष्यभर मिळेल पेन्शन; एकदाच गुंतवा LIC मध्ये पैसे | LIC investment scheme 2025

Obc कर्ज योजना साठी पात्रता काय आहे (What is the eligibility for Obc loan scheme)

  • १)obc loan scheme या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी लाभार्थी हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागतो.
  • २) ओबीसी कर्ज योजना या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील असावा लागतो.
  • ३) ओबीसी कर्ज योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय हे 18 ते 50 वर्षे या दरम्यान असावे लागते.
  • ४) obc loan scheme अंतर्गत कर्ज घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती चा सिबिल स्कोर हा 500 पेक्षा जास्त असावा लागतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील ?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र ( आठ लाखापेक्षा कमी )
  • जातीचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • उद्यम नोंदणी किंवा शॉप अक्ट लायसन्स

योजनेसाठी अर्ज कसा करावा ? OBC Mahamandal Loan Scheme

https://msobcfdc.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. अथवा जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरवर जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना तुम्हाला सर्व प्रथम तुम्हाला रजिस्टेशन करावे लागेल. त्यात तुम्हाला तुमची बेसिक माहिती विचारली जाईल. जसे वैयक्तिक माहिती, पत्ता, कुटुंबिक माहिती, उद्योगाचे नाव इ. माहित विचारली जाईल.

त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेले कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागेल. सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड झाल्यावर अर्ज सबमिट करावा.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

OBC Mahamandal Helpline

ओबीसी महा मंडळाकडून मिळालेले LOI लेटर घेऊन तुम्हाला बँक मध्ये घेऊन जायचे आहे. व बँकेला कर्जाची मागणी करायची आहे, बँक जे कागदपत्रे सांगतील ते कागदपत्रे तुम्हाला बँकेला आणून द्यायचे आहे. जर तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येत असेल तर, तुम्ही ओबीसी महा मंडळाच्या हेल्पलाईन क्रमांकवर कॉल करून संपर्क साधावा. 2527 5374 | 2529 9685

हेही वाचा – महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना; २ महिन्यांत ५ लाख महिलांनी घेतला या सरकारी योजनेचा लाभ | MSSC Scheme

ओबीसी कर्ज योजना 2025 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजना

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत(MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD) वर्ष 2024-25 करिता 1 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

  • 1. 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना
  • 2. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
  • 3. गट कर्ज व्याज परतावा योजना
  • 4. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो…. मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून OBC Loan Yojana marathi 2025 अंतर्गत ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वयंम उद्योगासाठी अनेक कर्ज योजना ह्या राबविण्यात येत आहेत. ओबीसी बांधवांना कृषी सलग्न व पारंपारिक उपक्रम व लघु उद्योग तसेच मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

अशा प्रकारच्या योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

Leave a Comment