राज्यातील गरजू महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप सुरू; महिलांनो असा करा अर्ज | Pink E-Rickshaw Yojana

By Chaughule Mahesh

Published on:

Pink E-Rickshaw Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई-रिक्षा ही योजना आणली आहे. महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये या रिक्षा योजनेची वाटप लवकरात लवकर होणार आहे. असे महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे बोलल्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नेमकं काय आहे पिंक ई-रिक्षा?

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई-रिक्षा ही महत्वाकांक्षी योजना राज्यातील आठ जिल्ह्यांकरीता राबविण्यात येणार आहे. यात नागपूर जिह्यामध्ये २००० महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. What is Pink E- Rickshaw

Pink E- Rickshaw वाटप जिल्ह्यांमध्ये होणार

पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा – लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता; परतू ५०० रुपयांची अट, काय आहे अपडेट्स जाणून घ्या | ladaki Bahin Yojana

पिंक ई-रिक्षा योजनेचे फायदे

benefits ofPink E- Rickshaw

  • पिंक ई-रिक्षा या योजनेमुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच महिलांचे सक्षमीकरण होईल.
  • पिंक ई-रिक्षा या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील.
  • या योजनेमुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
  • कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • महिला आत्मनिर्भर बनतील व स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.
  • शहरामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता

योजनेची उद्दिष्टे

  • पिंक ई-रिक्षाचा लाभ घेतल्यानंतर त्या स्वतः सक्षम होणार आहेत
  • त्या महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतर कोणाच्याही दैनंदिन खर्चावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • ही योजना महिलांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच सुरक्षिततेसाठी आणि गुलाबी ई-रिक्षातून प्रवास करणे अशा धोरणात्मक उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आमलात आणण्यात आली आहे.

हेही वाचा – पिठाची गिरणी अर्ज भरणे सुरू; पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती | mofat pithachi girani yojana 2025

योजनेसाठी कसे मिळणार अनुदान

  • ई-रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांच्या (GST, Ragistartion, Road Tax) समावेश असेल.
  • नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक, खासगी बँक इत्यादीकडून ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
  • राज्य शासन २० टक्के आर्थिक भार उचलेल.
  • योजनेची लाभार्थी महिला / मुली यांच्यावर १० टक्के आर्थिक भार असेल.
  • कर्जाची परतफेड ५ वर्षांची (६०) महिन्यांची असेल.
  • योजनेत महिलांना ५ वर्षांचा विमा करून दिला जाईल तसेच वाहन परवाना, प्रशिक्षण व बॅच बिल्ला दिला जाणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

  1. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.
  2. महिला लाभार्थ्याने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  3. महिला लाभार्थी कर्जबाजारी नसावी.
  4. कर्ज फेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
pink e rickshaw yojana maharashtra

योजनेसाठीची पात्रता

  1. पिंक ई-रिक्षा या अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. पिंक ई-रिक्षा या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल.
  3. पिंक ई-रिक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय २१ वर्षे ते ४० वर्षांदरम्मान असणे आवश्यक आहे.

पिंक इ-रिक्षा योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

document of Pink E- Rickshaw scheme

  • लाभार्थीना योजनेसाठी अर्ज,
  • आधार कार्ड,
  • पॅन कार्ड,
  • अधिवास प्रमाणपत्र,
  • कुटुंबप्रमुखाचा तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला,
  • मतदान कार्ड,
  • केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड,
  • बँक पासबुक,
  • पासपोर्ट फोटो,
  • मतदान ओळखपत्र,
  • रेशन कार्ड,
  • महिला स्वतः रिक्षा चालवण्याचे हमीपत्र,
  • महिलेचे बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र,
  • अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

हेही वाचा – महिलांना आनंदाची बातमी पुन्हा एकदा शिलाई मशीन योजना सुरू; लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या | Silai Machin Yojana

या ठिकाणी करावा लागणार अर्ज

या योजनेसाठी महिला व बालविकास भवन, समाज विकास अधिकारी महानगरपालिका, कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा परिषद, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामीण गटविकास अधिकारी कार्यालय, लोक संचालित समूह साधन केंद्र, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, याठिकाणी अर्ज करता येणार आहे.

पिंक इ-रिक्षा योजनेसाठी असा करा अर्ज

  • अर्जदाराचे वय २० ते ४० वर्षे असावे.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्रप्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी-माजी प्रवेशितांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो….

pink e rickshaw yojana maharashtra महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई-रिक्षा ही योजना आणली आहे. महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये या रिक्षा योजनेची वाटप लवकरात लवकर होणार आहे. असे महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे बोलल्या.

अशा प्रकारच्या योजनांच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा. आणि आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद…

Leave a Comment